Goa Education: सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणावर पालक संतप्त, मात्र शिक्षणतज्ज्ञ म्हणतात, "हा निर्णय योग्य"

Goa New Education Policy: नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून येत्या ७ एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
Goa Education
Goa EducationDainikGomantak
Published on
Updated on

डिचोली: एप्रिल महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयास विद्यार्थ्यांसह बहुतांश पालकांची हरकत असली, तरी डिचोलीतील बहुतांश शाळांमध्ये आवश्यक शैक्षणिक साधनसुविधा उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे.

शाळांमधील सुविधांचा आढावा घेतल्यास एप्रिल महिन्यात वर्ग सुरू केल्यास विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करताना कोणतीही अडचण येणार नसल्याचे स्पष्ट आहे. दुसऱ्याबाजूने तालुक्यातील ग्रामीण भागातील एक-दोन शाळा इमारती कमजोर असल्याचे दिसून आले आहे.

नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून येत्या ७ एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एप्रिल महिन्यात सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत वर्ग घेण्यात येणार आहेत. मे महिन्याच्या सुट्टीनंतर पुन्हा जून महिन्यात नियमित वर्ग घेण्यात येणार आहेत.

Goa Education
Goa School: कोकणी-मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर, स्थिती सुधारण्यासाठी शिक्षणाचे माध्यम इंग्रजीच करा; मायकल लोबोंचं आवाहन

एप्रिल महिना म्हणजे उकाड्याचे दिवस. त्यातल्या त्यात यंदा उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवणार, अशी भीती पालकांना वाटत आहे. नवीन शैक्षणिक वर्षाबाबत सरकारचा हा निर्णय बहुतेक पालकांना मान्य नाही. दुसऱ्याबाजूने हा निर्णय योग्य आहे, असे काही शिक्षणतज्ज्ञ आणि शाळा-संस्था चालकांना वाटत आहे.

डिचोली शहरात एक सरकारी मिळून चार माध्यमिक तर एक उच्च माध्यमिक शाळा आहे. या शाळांनी शैक्षणिक सुविधांची वानवा नाही. तालुक्यातील ग्रामीण भागातील गावोगावी माध्यमिक शाळा आहेत. यातील एक-दोन शाळा सोडल्यास बहुतेक सर्व शाळांमध्ये शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत.

Goa Education
Goa Corruption Case: "मडकईकरांना चौकशीसाठी बोलावून शहानिशा करा", तक्रारदारांची ACBकडे मागणी

प्रत्येक शाळेत वीजजोडणी, पंखे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी मूलभूत साधनसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्यात वर्ग घेतले, तर शाळाचालक संस्थांना मोठीशी अडचण येणार नाही.

दुसऱ्याबाजूने जनरेटरची सोय नसल्याने वर्ग सुरू असताना वीजपुरवठा खंडित झाल्यास मात्र विद्यार्थ्यांना असह्य उकाडा होणार आहे. मात्र, ही समस्या काही कायम उद्भवणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com