Goa Government Schools Dainik Gomantak
गोवा

Goa Government Schools: शाळा वाढल्या पण बाकडी रिकामी! 6 वर्षांत 49 सरकारी शाळा बंद, तर विनाअनुदानित शाळांमध्ये ८ ने वाढ!

Goa Government Primary Schools: सहा वर्षांत राज्‍यातील ४९ सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्‍या. परंतु, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांच्‍या संख्‍येत वाढ झाली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: सहा वर्षांत राज्‍यातील ४९ सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्‍या. परंतु, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांच्‍या संख्‍येत वाढ झाली. तर, दुसरीकडे या २०२०–२१ च्‍या तुलनेत २०२५–२६ मध्‍ये सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित अशा सर्वच शाळांतील विद्यार्थ्यांच्‍या संख्‍येत घट झाल्‍याचे सरकारने जारी केलेल्‍या एका अहवालातून समोर आले आहे.

गेल्‍या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे राज्‍यातील सरकारी प्राथमिक शाळांची अवस्‍था बिकट होत चाललेली आहे. त्‍यातून सहा वर्षांच्‍या काळात तब्‍बल ४९ शाळा बंद पडल्‍या.

पण, याच काळात २०२०–२१ च्‍या तुलनेत २०२५–२६ मध्‍ये अनुदानित शाळांची संख्‍या ५, तर विनाअनुदानित शाळांच्‍या संख्‍येत ८ ने वाढ झाल्‍याचे अहवालात म्‍हटले आहे. २०२०–२१ ते २०२५–२६ या काळात अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची संख्‍या केवळ २०२२–२३ मध्‍येच वाढली.

परंतु, त्‍यानंतरच्‍या काळात अनुदानितसह सरकारी आणि विनाअनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची संख्‍याही सातत्‍याने कमी होत गेल्‍याचेही अहवालातून स्‍पष्‍टपणे दिसून येते.

सरकारी प्राथमिक शाळांतील विद्यार्थी संख्‍या

वर्ष सरकारी अनुदानित विनाअनुदानित

२०२०–२१ १९,६०४ ५२,१८३ २३,९७५

२०२१–२२ १९,४४४ ५२,१२० २२,०४७

२०२२–२३ १९,६३८ ५२,५२८ २१,५६८

२०२३–२४ १९,२९० ५२,१९१ २१,१०३

२०२४–२५ १८,४६५ ५१,८९४ २१,०५६

२०२५–२६ १७,६८४ ५०,१४३ २०,९७३

सरकारी प्राथमिक शाळा

वर्ष सरकारी अनुदानित विनाअनुदानित

२०२०–२१ ७२८ २८४ १२७

२०२१–२२ ७१८ २८६ १२९

२०२२–२३ ७१२ २८७ १२९

२०२३–२४ ६९६ २८७ १३०

२०२४–२५ ६८७ २८९ १३२

२०२५–२६ ६७९ २८९ १३५

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

डोंगर माफियांची खैर नाही! डोंगरकापणीवरून कुठ्ठाळीतील राजकारण तापले; चौकशीच्या फेऱ्यात अडकणार दोषी

Mapusa Open Drains: पावसाळ्यात म्हापशात 'मृत्यूचे सापळे'! उघडी गटारे ठरतायत जीवितास धोका; आमदारांचा थेट अ‍ॅक्शन प्लॅन!

Goa Assembly Election: 'जागावाटप नंतर, आधी एकत्र या!' 2027 च्या रणधुमाळीसाठी काँग्रेसने फुंकले रणशिंग; 'आप'सोबत आघाडीच्या हालचालींना वेग

उठून पुन्हा खेळायला गेला, पण नियतीने डाव अर्ध्यावरच संपवला! बाणावलीच्या मैदानावर 26 वर्षीय खेळाडूचा मृत्यू

Saligao Petrol Pump: काही अंतरावर जाताच गाड्या बंद! साळगावच्या पेट्रोल पंपावर अचानक काय घडलं?

SCROLL FOR NEXT