E Bus Canva
गोवा

Panjim Smart City: पणजीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 'ई बसेस'वर विश्वास! गोवा सरकारने तयार केला प्रस्ताव

Panaji Smart City: राजधानी पणजीतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने अमलात आणल्या जाणाऱ्या तत्काळ उपाययोजनांचा तक्ता सरकारने गोवा खंडपीठाला सादर केला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राजधानी पणजीतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने अमलात आणल्या जाणाऱ्या तत्काळ उपाययोजनांचा तक्ता सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला सादर केला आहे. पणजीतील लोकोत्सव व सांस्कतिक कार्यक्रमासारख्या मेगा इव्हेंटवेळी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी ई बससेवा सुरू ठेवण्याचा प्रस्ताव सरकारने तयार केला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

पणजीतील वाहतूक व्यवस्थापनसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्वेच्छा याचिका घेऊन उपाययोजनांचा तक्ता सादर करण्याचे निर्देश दिले होते. जलसफरी बोटींच्या तिकिटांची विक्री करण्यासाठी संबंधित दलाल रस्त्याच्या बाजूनेच तिकीट काऊंटर टेबल घालून करतात, त्यामुळे तेथे पर्यटकांची गर्दी होते. त्यामुळे हे तिकीट विक्री केंद्र सांता मोनिका जेटीपासून काही अंतरावर असलेल्या बहुमजली पार्किंग इमारतीत हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

डी. बी. मार्गावरील रस्त्याच्या बाजूने वाहने पार्किंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणे सुरू केले आहे. मांडवी नदीच्या बाजूने रस्त्यावर वाहने उभी करण्यास बंदी आहे. त्यामुळे अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या वाहनांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. पार्किंग उल्लंघनाबद्दल गेल्या आठ महिन्यात सुमारे १०७० जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, तर मोटार वाहन कायद्याच्या कलम १३३ खाली उल्लंघन केल्याबद्दल २१० वाहन मालकांना नोटिसा बजावली आहे.

दुचाकी, चारचाकींना प्रवेशबंदी

मेगा इव्हेंटमध्ये उपस्थित राहण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या दुचाकी व चारचाकींना शहरात प्रवेश न देता कार्यक्रमांपर्यंत जाण्यासाठी कदंबच्या ई बससेवा सुरू करण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत. त्यांची ही वाहने सांता मोनिका येथील बहुमजली पार्किंग इमारतीत ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सांता मोनिका जेटीजवळ फूट ब्रिज

डी. बी. मार्गावरील सांता मोनिका जेटीजवळ पर्यटक रस्ता ओलांडत असल्याने त्या ठिकाणी लिफ्ट किंवा एस्केलेटरसह फूट ब्रिज बांधण्याची सूचना सरकारने नियुक्त केलेल्या समितीने केली आहे. या ठिकाणी किमान ७१ वाहनांच्या पार्किंगची तरतूद जेटी टर्मिनलच्या बांधकाम कंत्राटदाराला करायला सांगण्यात आले आहे व हे काम सहा महिन्यात पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT