Advocate Dainik Gomantak
गोवा

Goa Police: वकील मारहाण प्रकरणाची आता न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत होणार चौकशी

Goa Police: ॲड. गजानन सावंत मारहाण प्रकरणाची न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Police: ॲड. गजानन सावंत मारहाण प्रकरणाची न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश शुक्रवारी सरकारने काढले आहेत. न्यायदंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी मामू हागे यांच्याकडे हे प्रकरण चौकशीसाठी देण्यात आले असून, दीड महिन्याच्या कालावधीत चौकशी अहवाल देण्यात यावा, असेही आदेशात नमूद केले आहे.

गृहखात्याचे अवर सचिव विवेक नाईक यांनी हा आदेश पारीत केला आहे. पर्वरी येथे वकिलास पोलिसांनी मारहाण केली होती. या प्रकरणाविरोधात राज्यातील सर्व वकील संघटनांनी निषेध नोंदविला होता. मंगळवारी वकिलांनी रायबंदर येथील गुन्हे शाखेसमोर धरणे आंदोलन केले होते. मारहाण करणाऱ्या पोलिसांविरोधात कारवाई करण्याची मागणी वकिलांनी केली होती.

अखेर सायंकाळी पोलिस खात्याने या घटनेची दखल घेत चार पोलिसांना निलंबित केले होते. या प्रकरणी सरकारने कारवाई करण्यास केलेल्या विलंबामुळे विरोधकांना आयतेच कोलित मिळाले होते. त्यामुळे चोहोबाजूनी सरकारवर टीका होत असल्याने पोलिसांना निलंबित करण्याचे पाऊल पोलिस खात्याला उचलावे लागले होते.

तसेच, या प्रकरणाची सत्य परिस्थिती काय आहे, हे शोधण्याचे काम न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे ही चौकशीची जबाबदारी दिली असून, सहा आठवड्यांमध्ये त्यांना हा चौकशी अहवाल सरकारला सादर करावयाचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT