Goa Environmental Committee: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील 'ऑरेंज फॉक्स' कंपनी बंद

Goa Environmental Committee: गोव्यातील या वसाहतीतील प्रदूषणकारी कारखान्यांविरोधात आमदार युरी आलेमाव यांनी यापूर्वी तक्रार केली होती.
Orange Fox Company Goa
Orange Fox Company GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Environmental Committee: कोणत्याही प्रकारचा पर्यावरण मान्यता दाखला नसताना सुरु केलेला मेसर्स ऑरेंज फॉक्स स्टील प्रा. लिमिटेड हा कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील कारखाना बंद करण्याचा आदेश गोवा राज्य पर्यावरण मूल्यमापन समितीने दिला.

या वसाहतीतील प्रदूषणकारी कारखान्यांविरोधात आमदार युरी आलेमाव यांनी यापूर्वी तक्रार केली होती. या नवीन घडामोडींवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ही तर फक्त सुरुवात आहे. 5 डिसेंबर 2022 रोजी दिलेल्या तक्रारीची पत्राची दखल घेत, ही करवाई केल्याचे विरोधी पक्षनेते आलेमाव यांनी सांगितले.

Orange Fox Company Goa
Old Goa: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तलवारीची नासधूस, ग्रामस्थांमध्ये तणाव

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत कार्यान्वित असलेल्या सर्व बेकायदेशीर आणि प्रदूषणकारी कारखान्यांना हा एक संदेश आहे. लोकांचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे. खूप उशीर होण्याआधी इतर बेकायदेशीर आणि प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांविरोधात सक्रियपणे कारवाई करावी, अशी मी पुन्हा एकदा सरकारी अधिकाऱ्यांना विनंती करतो, असे युरी आलेमाव म्हणाले.

बेकायदेशीरपणे कार्यरत असलेला पोलाद कारखाना बंद करण्याच्या गोवा राज्य तज्ज्ञ मूल्यांकन समितीने गोवा राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाला केलेल्या शिफारशीवर प्रतिक्रिया देताना, आमदार म्हणाले, असे सर्व कारखाने व आस्थापने कायमची बंद होईपर्यंत आपण शांत बसणार नाही.

कारभारावर लक्ष ठेवा

सरकारने विसर्व विभाग सक्रिय करावेत आणि औद्योगिक वसाहतीतील कारभारावर बारीक लक्ष ठेवावे. मर्यादेपलीकडे बेकायदेशीर उत्पादन करून राज्याच्या महसुलाचे मोठे नुकसान करत असलेल्या आस्थापनांविरुद्ध कारवाई होणे गरजेचे असल्याचे युरी आलेमाव यांनी म्हटले असून त्यासाठी प्रभावी देखरेख यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com