Goa Government | Mavin Gudinho Dainik Gomantak
गोवा

Goa Government: 'गोवा टॅक्सी'द्वारे टॅक्सीमालकांना 90 टक्के भाडे- माविन गुदिन्हो

Goa Government: सरकारने गोवा टॅक्सी हे नवीन ॲप डिसेंबरपर्यंत सुरु होणार असल्याची घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Government: सरकारने गोवा टॅक्सी हे नवीन ॲप डिसेंबरपर्यंत सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे. गोवा टॅक्सी ॲपद्वारे सेवा देणाऱ्या टॅक्सीमालकांना 90 टक्के भाडे दिले जाईल. तसेच 5 टक्के व्यवहार खर्च आणि 5 टक्के टॅक्सीचालकांच्या कल्याणासाठी वापरण्यात येतील, असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले. पर्वरी येथील विधानसभा संकुलात ते पत्रकारांशी बोलत होते.

आजही काही टॅक्सीमालक दिवसाला फक्त एक ट्रिप करून आराम करण्याची मानसिकता बाळगून आहेत. जग पुढे गेले असून टॅक्सीमालकांनीही पुढे जाण्याची आवश्‍यकता आहे. ॲप आणण्यामागे सरकारचा कोणताही छुपा हेतू नाही. गोव्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यंत वाईट स्थितीत आहे.

रिक्षा आणि मोटारसायकल पायलट फार कमी ठिकाणी उपलब्ध आहेत. ॲप आधारित टॅक्सीमुळे मद्यपान करून वाहन चालवणे कमी होईल, पार्किंग समस्या कमी होतील आणि वाहनांचा अधिक कार्यक्षमपणे वापर होईल. त्यामुळे गोव्यात ॲप आधारित टॅक्सी सुरू होण्याची वेळ आली आहे, असे गुदिन्हो म्हणाले.

टॅक्सीचालकांसाठी विशेष निधी

आम्ही ॲप अशा प्रकारे तयार करू, जेणेकरून टॅक्सीचालकांमध्ये आपण याचा एक भाग असल्याची भावना निर्माण होईल. एक विशेष निधी तयार केला जाईल, जो टॅक्सी व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या कल्याणासाठी वापरला जाईल.

गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडद्वारे ॲप विकसित केले जाणार असून यावर्षी डिसेंबर किंवा पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये ते सुरू होण्याची शक्यता आहे, असे गुदिन्हो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: साडेचार हजार मतांचा फायदा कोणाला?

IND vs AFG Match Cancelled: एकही चेंडू न खेळता टीम इंडियाची एशियन गेम्सच्या सेमीफायनलमध्ये एन्ट्री! मुसळधार पावसामुळे भारत-अफगाणिस्तान सामना रद्द

Manoj Parab: मनोज परब पुन्हा राजकीय आखाड्यात? 2 ऑक्टोबरला भूमिका करणार स्पष्ट; दुसरा गट स्थापन करण्याची तयारी

South Goa Crime Cases: दक्षिणेत 8 महिन्यांत 525 गुन्ह्यांचा छडा, खुनाच्या सर्व सहा प्रकरणांची उकल

Surya Gochar 2026: हस्त नक्षत्रात सूर्याचे आगमन! 5 भाग्यवान राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; उत्पन्नात होणार घसघशीत वाढ

SCROLL FOR NEXT