Goa Government | Morjim Beach Dainik Gomantak
गोवा

Goa Government: मोरजी अन् मांद्रे किनारे कमर्शियल झोन!

Goa Government: मांद्रे अन् मोरजी हे कमर्शियल झोन जाहीर केल्यामुळे एक प्रकारचा संताप आणि नाराजीचा सूर आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Government: मोरजी पंचायत क्षेत्रात कासव संवर्धन मोहीम राबविली जाते. त्याचाच भाग म्हणून सरकारने आणि पर्यावरण विभागातर्फे मोरजी आणि मांद्रे हे किनारे संवेदनशील आणि सायलेंट झोन म्हणून जाहीर केले होते. आता सरकारने आपल्या राजपत्रात मांद्रे आणि मोरजी हे कमर्शियल झोन जाहीर केल्यामुळे एक प्रकारचा संताप आणि नाराजीचा सूर आहे.

सरकारच्या राजपत्रात 13 जानेवारी 2022 च्या पान क्रमांक 971 मध्ये मोरजी व मांद्रे किनारा हा कमर्शियल झोन जाहीर केलेला आहे. त्याचप्रमाणे कळंगुट, कांदोळी, बागा, आगोंद, म्हापसा मार्केट मार्ग असे परिसर कमर्शियल झोन केले आहेत.

मोरजी पंचायत क्षेत्रात साल 2000 मध्ये सरकारने टेंबवाडा किनारी भागात एकूण पाचशे चौरस मीटर जागा ही कासव संवर्धन मोहिमेसाठी आरक्षित केली हाती. त्या ठिकाणी शॅक उभारण्यास सरकार परवानगी देत नाही.

हळूहळू आश्‍वे-मांद्रे या ठिकाणीहीकासव येऊन अंडी घालू लागल्याने हाही परिसर सायलेंट झोन म्हणून सरकारनेत्या काळात जाहीर केला होता. परंतु१३ जानेवारी रोजी सरकारने आपल्या राजपत्रात मांद्रे आणि मोरजी हे दोन्ही किनारे कमर्शियल झोन केल्यामुळे पर्यटन व्यवसायाशी निगडित असलेल्यांना आनंद होत आहे.

ॲड. प्रसाद शहापूरकर-

आठ दिवसांपूर्वी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ध्वनी प्रदूषण नियंत्रण समितीची बैठक झाली आहे. त्यावेळी अचानक सायलेंट असलेले झोन कमर्शियल झोन का केले, असा सवाल अधिकाऱ्यांना आम्ही विचारला असता याबाबत अधिकाऱ्यांनीही काही कल्पना नसल्याने या संदर्भात सर्व माहिती घेऊन समितीसमोर ठेवणार असल्याचे सांगितले. त्यामुळे पुढील बैठकीत जो काही निर्णय होईल त्यानंतर पुढील कृती ठरविण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sacorda: सफर गोव्याची! पावसाळ्यात हिरवीगार शाल पांघरणारे, कदंबकालीन शिवमंदिराची भक्ती करणारे 'साकोर्डा'

Iranian Warship Attack: श्रीलंकेच्या किनाऱ्यावर इराणच्या युद्धनौकेवर पाणबुडी हल्ला, ‘IRIS डेना’ समुद्रात बुडाली; 101 कर्मचारी बेपत्ता, 78 जखमी

Milind Soman Goa Swimming: गोव्यात मिलिंद सोमणचं हटके होळी सेलिब्रेशन! खवळलेल्या समुद्रात 15 किमी स्विमिंग; अचाट स्टॅमिना पाहून नेटकरी थक्क VIDEO

T20 World Cup 2026 Semifinal: "हार मानणं आमच्या रक्तात नाही!" सेमीफायनलपूर्वी हॅरी ब्रूकचा भारताला तगडा इशारा; टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्यासाठी ठोकला शड्डू

Mumbai Margao Vande Bharat Express चे डबे वाढणार कधी? प्रवाशांची 20 डब्यांची मागणी; सावंतवाडी येथे थांबा अपेक्षित

SCROLL FOR NEXT