Goa SSC HSSC Exam : गोव्यात दहावी, बारावीची परीक्षा 10 नोव्हेंबरपासून होणार सुरु

दहावीची परीक्षा 29 नोव्हेंबरला संपेल तर बारावीची सहामाही परीक्षा 25 नोव्हेंबरला संपणार आहे
Goa SSC Exam Result
Goa SSC Exam ResultDainik Gomantak

Goa SSC HSSC Exam : गोवा शालांत मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या पहिल्या सहामाही परीक्षेला 10 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. दहावीची परीक्षा 29 नोव्हेंबरला संपेल तर बारावीची सहामाही परीक्षा 25 नोव्हेंबरला संपणार आहे, असे माहिती गोवा शालांत परीक्षा मंडळाकडून देण्यात आली आहे.

दहावी आणि बारावी अशा दोन्ही परीक्षांसाठी प्रत्येकी सुमारे 18 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची दुसरी सहामाहीची परीक्षा 1 एप्रिल 2023 रोजी सुरू होण्याची शक्यता आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी मंडळाने विशेष मूल्यांकन पद्धत तयार केली आहे. त्यानुसार गुणांची आखणी केली जाणार आहे. त्यामुळेच दोन वेगवेगळ्या सत्रांसाठी पाठ्यपुस्‍तक अभ्यासक्रमाची विभागणी करण्यात आली आहे.

Goa SSC Exam Result
Wagro Konkani Film : गोव्याच्या 'वाग्रो'चा गौरवास्पद प्रवास

प्रथम सत्रातील परीक्षेत विद्यार्थ्यांचे मूल्यमापन बहुपर्यायी प्रश्नांच्या आधारे केले जाणार आहे, तर दुसऱ्या सत्र परीक्षेत व्यक्तिनिष्ठ प्रश्नांवर आधारित मूल्यांकन केले जाणार आहे. यानंतर शालेय अंतर्गत गुणांसह दोन्ही मुदतीच्या परीक्षांचे गुण विद्यार्थ्याच्या अंतिम एकूण गुण दिले जाणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी गोवा शालांत मंडळाने पहिल्यांदाच दहावी आणि बारावीच्या सहामाहीच्या दोन वेगवेगळ्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. तसेच प्रत्येक विषयाच्या पेपरसाठी दीड तासांचा वेळ निश्चित केला होता. मागच्या वर्षी दहावीची पहिल्या सहामाहीची परीक्षा 1 डिसेंबर 2021 आणि दुसरी सहामाहीची 4 एप्रिल 2022 पार पडली होती. तसेच बारावीची पहिली सहामाही परीक्षा 8 डिसेंबर 2021 आणि दुसरी 18 मार्च 2022 पार पडली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com