Money |Goa Government Dainik Gomantak
गोवा

Goa Government: पुढील दोन वर्षांत गोवा सरकारला फेडावे लागणार तब्बल 10,277 कोटी रुपये

गोवा सरकारला मुख्य रक्कम व त्यावरील व्याज मिळून तब्बल 10,277 कोटी रुपये फेडावे लागणार आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Government: राज्य सरकारचे एकूण कर्ज पाच वर्षांत 53 टक्क्यांनी वाढल्याने राज्याच्या अर्थसंकल्पावर त्याचा गंभीर परिणाम झाला असल्याचा निष्कर्ष महालेखापालांनी मार्च 2021 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षाच्या तपासणीतून काढला आहे. विशेष म्हणजे, पुढच्या दोन वर्षांत (2025-26) सरकारला मुख्य रक्कम व त्यावरील व्याज मिळून तब्बल 10,277 कोटी रुपये फेडावे लागणार आहेत.

राज्य सरकारने बाजारातून घेतलेले कर्ज रुपये 2,390 कोटी असून, 2023-24 पर्यंत त्यावरचे व्याज रुपये 3,577 कोटी फेडावे लागणार आहेत. 2025-26पर्यंत मुख्य कर्जाचा रुपये 2,304 कोटींचा हिस्सा व त्यावरचे व्याज 2,006 कोटी रुपये फेडावे लागणार आहे.

म्हणजेच पुढच्या दोन वर्षांत (2025-26) सरकारला मुख्य रक्कम व त्यावरील व्याज मिळून 10.277 कोटी रुपये फेडावे लागणार आहेत. याच काळात म्हणजे 2026-27 व त्यापुढे 2030-31 या वर्षांमध्ये राज्य सरकारला मुख्य कर्जाची रक्कम रुपये 11.370 कोटी रुपये व त्यावरील व्याज 2,838 कोटी रुपये फेडावे लागणार आहे.

हे अर्थविषयक कायद्याचे उल्लंघन

सरकारने 26.03 कोटी रुपये कोणतेही अर्थसंकल्पीय तरतूद न करता खर्च केले आहेत. अर्थविषयक कायदा 204 चे हे पूर्णपणे उल्लंघन असल्याचे नमूद केले आहे. 2021 च्या आर्थिक वर्षात सरकारने 18.52 टक्के एकूण अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार वापरला गेला नाही.

मूळ अर्थसंकल्पाच्या पुरवणी तरतुदीत केलेली 5.18 टक्के वाढ ही अनावश्‍यक होती. 2021 मध्ये 2088.95 कोटी जादा खर्च तसेच 2008-9 ते 2019-20 या काळात 9,81.04 कोटी नियमानुसार नियमित करण्यासाठी प्रलंबित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT