Tourism Minister rohan khaunte Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: गोव्याच्या आध्यात्मिक पर्यटनाला मिळणार उभारी! ‘एकादश’ उपक्रमाला आता ‘सरिता पूजन’ची जोड; पर्यटनमंत्र्यांची मोठी घोषणा

Ekadash Tirth & Gomant Sarita Poojan: गोवा सरकारने ‘एकादश तीर्थ’ उपक्रम हाती घेतला असून, यामध्ये राज्यातील ११ पवित्र मंदिरे एकाच आकृतीबंधात समाविष्ट केली जातील. त्याला सरिता पूजन उपक्रमाची जोड दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Govt Introduces 'Ekadash Tirth' & 'Gomant Sarita Poojan' Initiatives

पणजी: गोवा सरकारने ‘एकादश तीर्थ’ उपक्रम हाती घेतला असून, यामध्ये राज्यातील ११ पवित्र मंदिरे एकाच आकृतीबंधात समाविष्ट केली जातील. त्याला सरिता पूजन उपक्रमाची जोड दिली असून यामुळे पर्यटकांना गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक, धार्मिक वारशाचा अनुभव घेता येईल,असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

‘गोमंत सरिता पूजन’ या नव्या उपक्रमाची घोषणाही त्यांनी केली. मांडवी, झुवारी आणि वाळवंटी या तीन प्रमुख नद्यांच्या संगमस्थळी (नार्वे) ही पूजाअर्चा होणार आहे. या उपक्रमामुळे गोव्याच्या पर्यटन (Tourism) क्षेत्राला नवे परिमाण मिळणार असून, पर्यटक आणि भाविकांसाठी एक वेगळा आध्यात्मिक अनुभव उपलब्ध होणार आहे.

गोव्याला (Goa) आध्यात्मिक पर्यटनाचे केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे,असे सांगून तीन दिवशीय मंदिर जोड परिषदेत गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी राज्याच्या आध्यात्मिक पर्यटन धोरणावर प्रकाश टाकला. पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून, हरवळे धबधब्याजवळील रुद्रेश्वर मंदिराचा परिसर विकसित केला जाणार आहे. तसेच, एकादश तीर्थ योजनेतील नार्वे येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिरात नव्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असेही खंवटे यांनी जाहीर केले. मंदिर जोड परिषदेत मंदिरे संवर्धन, तीर्थयात्रा पर्यटन आणि वारसा जतन यासंबंधी चर्चा झाली.

आध्यात्मिक पर्यटनाला चालना!

परिषदेत बोलताना पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले की, आध्यात्मिक पर्यटन हे गोव्याच्या पुनरुज्जीवित पर्यटन धोरणाचा महत्त्वाचा भाग आहे. ‘एकादश तीर्थ’ उपक्रम आणि ‘गोमंत सरिता पूजन’ यामुळे गोव्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाला नवी ओळख मिळेल. हा उपक्रम आध्यात्मिक पर्यटनास चालना देऊन राज्याच्या पर्यटनाच्या भविष्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.

गंगाआरतीचे अनुकरण

गंगेच्या आरतीप्रमाणेच हे पूजन आध्यात्मिक व पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून आयोजित करण्यात येईल. उत्तराखंडमध्ये गंगेच्या किनारी होत असलेल्या भव्य आरतीने प्रेरित होऊन, गोवा सरकारने उत्तराखंड सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. त्यांच्या तांत्रिक आणि सांस्कृतिक अनुभवाचा आधार घेत गोव्यात पहिल्यांदाच नदी आरती सुरू केली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT