Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane: सरकारी आरोग्य केंद्रांचे कार्य स्तुत्य, साखळी इस्पितळामुळेच आईला जीवदान!

आरोग्यमंत्री विश्‍वजित राणेंची भावना

गोमन्तक डिजिटल टीम

Vishwajit Rane ‘माझ्या आईची प्रकृती एका आजारामुळे खालावली होती. आपण पूर्णपणे बेचैन झालो होतो, काय करावे काहीच समजेनासे झाले होते. मुंबईतील डॉक्टरांशी चर्चा सुरू होती. तेव्हा विनोद शिंदे यांनी डॉ अतुल पै बीर यांचे नाव सुचविले.

आपण मुख्यमंत्र्यांकडे याविषयी विचारणा केली असता त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देऊन धीर दिला. डॉ. अतुल पै बीर आवश्यक किट व आपल्या पथकासह आले आणि त्यांनी माझ्या आईच्या प्रकृतीचा अंदाज घेऊन लगेच आवश्यक इंजेक्शने दिली.

त्यामुळे तिची प्रकृती स्थिर होऊन तिला जीवदान मिळाले. त्यानंतर त्या बऱ्या होऊन कालच्या ध्वजारोहण सोहळ्यातही सहभागी झाल्या, अशी भावना आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी व्यक्त केली.

साखळीत नेत्रचिकित्सा आॅपरेशन थिएटरच्या उदघाटन सोहळ्यात आरोग्यमंत्री राणे यांनी माईकचा ताबा घेत भावूक होऊन वरील आपला अनुभव सांगितला.

सरकारी आरोग्य केंद्रे ही लोकांचे जीवन वाचवण्याचे काम चोखपणे करीत असतात. आपल्या माणसाचा जीव वाचतो. त्यावेळी या आरोग्य केंद्रांच्या कार्याची जाणीव होते. डॉ. अतुल पै बीर यांचे आभार मानतो. त्यांच्या जलद कृतीच्या क्षमतेमुळे आज आईचे जीवन पुन्हा उभे राहू शकले.

डॉ.अतुल पै बीर यांचे कौतुक-

सरकारी आरोग्य केंद्र व इस्पितळांमधील डॉक्टर्स व कर्मचारी खरेच चांगले काम करतात. लोकांचे जीव वाचवतात. साखळीतील आरोग्य केंद्र मुख्यमंत्री डॉ.. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली चांगली कामगिरी करीत आहे.

लोकांनी या आरोग्य सेवेवर विश्वास ठेवून आपल्या आरोग्याच्या तक्रारी सोडवाव्यात, असे आवाहन यावेळी आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी केले. डॉ. अतुल पै बीर यांचे यावेळी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जाहीर कौतुक करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: किंग कोब्राला चक्क किस करण्याचा प्रयत्न; पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून लोकांची धाकधूक वाढली, पाहा व्हायरल व्हिडिओ

Election Commission: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारवाईला आम्ही कंटाळलो! 'गोवा काँग्रेस पक्ष' नोंदणी प्रक्रियेसंदर्भात कोर्ट नाराज

VIDEO: वकिलाची गाडी अडवून मारहाण अन् शिवीगाळ, आमदार पुत्राची गुंडगिरी; तक्रारीनंतरही FIR नाही, पोलिसांच्या भूमिकेवर सवाल!

Myanmar Airstrike: म्यानमारमध्ये मृत्यूचं भयानक तांडव! गजबजलेल्या बाजारात अचानक हवाई हल्ला; 49 जणांचा मृत्यू; 58 जखमी, थरारक VIDEO समोर

Horoscope: संकष्टी चतुर्थीला जुळून आलाय अत्यंत दुर्मिळ शुभ योग! बाप्पाच्या आशीर्वादाने 'या' 5 राशींचे उघडणार नशिबाचे दरवाजे, नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत

SCROLL FOR NEXT