Goa Government | Vikas Bhagat Dainik Gomantak
गोवा

Goa Government: गोंयकार संघटनेचा रस्ता चौपदरीकरणासाठी वृक्षतोडीला 'तीव्र' आक्षेप!

Goa Government: गोंयकार संघटना चौपदरी रस्त्याच्या विरोधात नाही. मात्र, निसर्गाचा समतोल राखून करमल घाटातील रस्ता रुंद करावा.

दैनिक गोमन्तक

Goa Government: गुळे ते बाळ्ळीपर्यंतच्या हमरस्त्यावर करमल घाटात झाडे कापून चौपदरी रस्ता करण्याचा प्रयत्न झाल्यास हरित लवादाकडे दाद मागणार असल्याचे गोंयकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल काणकोणात पत्रकार परिषदेत सांगितले.

गोंयकार संघटना चौपदरी रस्त्याच्या विरोधात नाही. मात्र, निसर्गाचा समतोल राखून करमल घाटातील रस्ता रुंद करावा, असे संघटनेचे पदाधिकारी विकास भगत, संदेश तेलेकर यांनी सांगितले. करमल घाट रस्ता रुंद करायचा झाल्यास सात किमी लांबीच्या टापूत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करावी लागणार आहे.

मात्र या भागात बोगदा केल्यास त्याची लांबी फक्त 1.7 किलोमीटर राहणार आहे. देशात आतापर्यंत 13 किमी लांबीचे बोगदे तयार केले आहेत. बोगदा खोदण्याच्या तंत्रज्ञानात आता मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे बांधकाम खर्च वाढेल; पण निसर्गाच्या ऱ्हासापेक्षा तो कमी असेल, असे संघटनेचे अध्यक्ष जॅक फर्नांडिस म्हणाले.

वृक्षसंहार टाळण्यासाठी बोगद्याचा पर्याय

बोगदा काढून रस्ता केल्यास वाहनांची वेगमर्यादा प्रतितास 80 ते 100 किमीपर्यंत जाणार असून वनसंहारही टाळणे शक्य आहे. हा अहवाल समितीने तीन वर्षांपूर्वी सरकारला सादर केला होता. मात्र, सरकारने या पर्यायावर विचारच केलेला नाही. उशिरा का होईना, आता गुळे ते बेंदुर्डेपर्यंतच्या चौपदरी रस्त्याच्या भूसंपादनासाठी 79 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असे भगत म्हणाले.

13 हजार झाडांवर गंडांतर: सरकारने या चौपदरी रस्त्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीने, आहे त्या रस्त्याचे रुंदीकरण केल्यास भविष्यात भूस्खलन होण्याची भीती व्यक्त करून बोगदा करण्याची शिफारस केली होती.

त्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी 13 हजार झाडांची कत्तल करावी लागणार आहे. त्यामुळे आडवळणाची तीव्रता काही प्रमाणात कमी होईल. मात्र, वाहनांची प्रतितास वेगमर्यादा 40 ते 50 किमी राहील, असे यावेळी सांगण्यात आले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना साकडे

बोगद्याच्या पर्यायाविषयी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना साकडे घालण्यात येईल. शिवाय बोगद्याचा पर्याय कसा योग्य आहे, हे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. यासंबंधी गडकरी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला आहे, असे फर्नांडिस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT