Goa stray dog problem solution Dainik Gomantak
गोवा

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे गोवा सरकारकडून अनुकरण; भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना

Stray Dogs Menace Goa: टास्क फोर्सने भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अक्शन प्लॅन तयार करुन त्याची अमंलबजावणी करणे अपेक्षित आहे.

Pramod Yadav

पणजी: राज्यातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गोवा सरकारने टास्क फोर्सची स्थापना केली आहे. त्रिसदस्यीय समितीच्या मार्फत भटक्या कुत्र्यांचे निवारा केंद्रात स्थलांतर करण्याबाबत अक्शन प्लॅन ठरवला जाणार आहे. दिल्लीतील भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या एक दिवसांनंतर गोवा सरकारने ही टास्क फोर्सची घोषणा केली.

राजधानी दिल्लीतील भटक्या कुत्र्यांचे निवारा केंद्रात स्थलांतर केले जावे, अशा प्रकारचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यानंतर समाज माध्यमातून विविध प्रतिक्रिया समोर येत असाताना गोव्याने देखील सर्वोच्च न्यायालयाचे अनुकरण केल्याचे दिसत आहे.

गोवा सरकारच्या पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा संचालनालयाने मंगळवारी जारी केलेल्या आदेशानुसार, "भटक्या कुत्र्यांची समस्या आणि त्यांचे निवारा केंद्रात पुनर्वसन करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे."

स्थानिक पंचायत आणि पालिकांची मदत घेऊन टास्क फोर्सने भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अक्शन प्लॅन तयार करुन त्याची अमंलबजावणी करणे अपेक्षित आहे.

राज्याचे पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयाचे स्वागत केले आहे. गोव्यात गेल्या काही दिवसांत कुत्र्यांने चावा घेतल्याचा विविध घटना घडल्याचे त्यांनी नमूद केले.

फोंडा येथे एक वर्षीय बाळाचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना एप्रिलमध्ये घडली. याशिवाय इतर घटना समोर आल्या आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी देखील याबाबत चर्चा करणार असल्याचे मंत्री हळर्णकरांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले.

गोवा पर्यटन राज्य असल्याने या ठिकाणीची भटक्या कुत्र्यांची समस्या चिंताजनक असल्याचा सूर विधानसभेत देखील दिसला होता. समुद्र किनारी भागात याचा पर्यटकांना मोठा त्रास होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले होते. एका आकडेवारीनुसार, राज्यात सध्याच्या घडीला ५६ ते ६० हजार भटके कुत्रे आहेत.

लोकसभेत दिलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात २०२४ मध्ये कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. २०२४ मध्ये अशा १७,२३६ घटना समोर आल्या असून, २०२२ मध्ये ८,०५७ तर २०२३ मध्ये ११,९०४ घटना उघडकीस आल्या होत्या. 

पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय खात्याचे उपसंचालक डॉ. नितीन नाईक यांच्या अध्यक्षतेखाली या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. यात डॉ. अतानाझिया फर्नांडिस आणि डॉ. शार्लेट फर्नांडिस यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT