Mumbai-Goa Highway: गणेशोत्सवासाठी गावी जाताय? मुंबई-गोवा महामार्गावर असणार 'या' वाहनांना बंदी! वाचा सविस्तर माहिती

Mumbai Goa highway traffic update: गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी यंदाही प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे
mumbai goa road news
mumbai goa road newsDainik Gomantak
Published on
Updated on

सारांश

  • गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील गर्दी टाळण्यासाठी २३ ते २६ ऑगस्टदरम्यान अवजड वाहनांना बंदी

  • रुग्णवाहिका, रेशनिंग साहित्य व अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना मात्र यात सूट.

  • या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सोपा व जलद होणार.

मुंबई: गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी यंदाही प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गणेश चतुर्थीच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान होण्यास मदत होणार आहे.

अत्यावश्यक सेवांना मात्र मुभा

यंदा गणेश चतुर्थीला २४ ऑगस्ट २०२५ रोजी सुरुवात होत असल्याने २३ ते २६ ऑगस्ट या काळात महामार्गावर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ही वाहतूक बंदी सर्वसाधारणपणे अवजड वाहनांसाठी असली तरी, रुग्णवाहिका, रेशनिंगचे साहित्य तसेच इतर अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना मात्र यातून वगळण्यात आले आहे. लवकरच या संदर्भात अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केले जाईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

पुणे मार्गे अवजड वाहनांसाठी पर्यायी व्यवस्था

मुंबई-गोवा महामार्गावर बंदी असली तरी, अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. या काळात अवजड वाहने पुणे-सातारा-कराड-कोल्हापूरमार्गे गोव्याच्या दिशेने प्रवास करू शकतात. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या घाटमार्गातून या वाहनांना कोकणात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

वाहतूक नियंत्रणासाठी विशेष पथके तैनात

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची विशेष पथके महामार्गावर ठिकठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत. तसेच, बंद पडणाऱ्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून 'टोईंग व्हॅन'ची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.

mumbai goa road news
Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! कारची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू

यामुळे चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि त्रासमुक्त होईल, अशी अपेक्षा आहे. यंदा एसटी महामंडळाने नेहमीच्या बसेससोबत जवळपास ३ हजार जादा बसेस चालवण्याचे नियोजन केले आहे, ज्यामुळे प्रवाशांची गर्दी विभागली जाण्यास मदत होईल.

प्रश्न व उत्तरे (FAQ's)

  1. प्रश्न: गणेशोत्सवादरम्यान कोणत्या महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे? (Which highway has measures been taken to avoid traffic jams during Ganesh festival?)
    उत्तर: मुंबई-गोवा महामार्गावर ही उपाययोजना करण्यात आली आहे.

  2. प्रश्न: अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी कोणत्या तारखांना लागू राहील? (On which dates will the ban on heavy vehicles be in force?)
    उत्तर: २३ ते २६ ऑगस्ट २०२५ दरम्यान बंदी राहील.

  3. प्रश्न: या बंदीतून कोणत्या वाहनांना सूट देण्यात आली आहे? (Which vehicles are exempted from this ban?)
    उत्तर: रुग्णवाहिका, रेशनिंग साहित्य व अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना सूट आहे.

  4. प्रश्न: गणेश चतुर्थीची सुरुवात यंदा कधी होत आहे? (When does Ganesh Chaturthi begin this year?)
    उत्तर: यंदा गणेश चतुर्थी २४ ऑगस्ट २०२५ रोजी सुरू होत आहे.

  5. प्रश्न: हा निर्णय का घेण्यात आला आहे? (Why was this decision taken?)
    उत्तर: कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व वेगवान व्हावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com