Goa Government |Electricity Price  Dainik Gomantak
गोवा

Goa Government: वर्षाच्या सुरुवातीलाच गोवेकरांना वीज दरवाढीचा शॉक

वीज खात्याने दरवाढीची शिफारस केली असून, त्यात घरगुती वीज ग्राहकांसाठी प्रति किलोवॅट 15 ते 60 पैसे, तर उच्च दाबाच्या घरगुती विजेवर प्रति किलोवॅट 70 पैसे वाढ सुचविली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Government: वीज खात्याने आपल्या महसुलातील तूट भरून काढण्यासाठी वर्षाच्या सुरुवातीलाच ग्राहकांच्या खांद्यावर दरवाढीचा बोजा टाकण्याची तयारी सुरू केली आहे.

खात्याने दरवाढीची शिफारस केली असून, त्यात घरगुती वीज ग्राहकांसाठी प्रति किलोवॅट 15 ते 60 पैसे, तर उच्च दाबाच्या घरगुती विजेवर प्रति किलोवॅट 70 पैसे वाढ सुचविली आहे. शिवाय हॉटेल व्यवसायासाठी 35 पैसे प्रति किलोवॅट वीज दरवाढ सुचविली आहे.

वीज खात्याने सरकारला महसूल अहवाल सादर केला आहे. त्या अहवालात ही प्रस्तावित दरवाढ सुचविली आहे. 2022-23 मध्ये महसुलात 298.33 कोटींची तफावत आहे. 2023-24 मध्ये ही तफावत 483.65 कोटींवर जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे 2023-24 च्या प्रस्तावित टेरिफ वाढीतून वीज खात्याला 134.96 कोटींचा अतिरिक्त महसूल प्राप्त होईल. शिवाय 348.98 कोटींची प्रस्तावित तफावत राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय आधाराद्वारे जुळवून घेतली जाईल. यातून महसुली तफावत शुन्यावर आणण्यात येईल, असे खात्याच्या अहवालात स्पष्ट केले आहे.

प्रतिवर्षी तफावत भरून काढण्यासाठी राज्य सरकार अर्थसंकल्पाद्वारे खात्याला मदत करते. ही मदत दीर्घकालीन नसल्याने या दरवाढीतून अंशतः तफावत कमी करण्याचा खात्याचा प्रयत्न आहे. मात्र, ग्राहकांना दरवाढीचा मोठा फटका बसू नये, यासाठी अल्पशी दरवाढ सुचविली आहे. त्यातूनच निश्‍चित शुल्क 22 रुपये प्रतिकिलोवॅट प्रतिमहा वाढविण्याचा प्रस्ताव आहे.

हरकती 24 तारखेपर्यंत पाठवा!

या प्रस्तावित वीज दरवाढीच्या शिफारशीवर लोकांकडून हरकती, सूचना आणि मते मागविली आहेत. ती वीज खात्याचे सचिव, अथवा मुख्य वीज अभियंता, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, विद्युत भवन, पणजी या पत्त्यावर अथवा cee-elec-goa@nic,in या संकेतस्थळावर 24 जानेवारीपर्यंत पाठवावीत, असे मुख्य विद्युत अभियंत्यांनी कळविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT