Mahadayi Water Dispute: साखळी पालिकेने शहरातील मैदानाची परवानगी नाकारली असली तरी ‘सेव्ह म्हादई’ मंचची 16 रोजी होणारी सभा आता साखळीतीलच विर्डी-आमोणा पुलाशेजारील मैदानावर होईल, असे सभेचे आयोजक प्रा. प्रजल साखरदांडे यांनी पणजीतील आझाद मैदानावर जाहीर केले.
या सभेला उपजिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली असून ती खासगी जागेमध्ये होणार आहे. सभेच्या तयारीला जोरात सुरुवात झाली आहे.प्रा. साखरदांडे म्हणाले, म्हादईचा लढा हा केवळ या आंदोलनकर्त्यांचा नसून तो तमाम गोवेकरांचा आहे.
म्हादईचे पाणी वळवल्यास सहा तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. तरीही सरकार याबाबत गंभीर नाही. उलट या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या आंदोलकांचा आवाज दाबला जातो आहे. त्यामुळे आम्ही या सरकारचा निषेध करतो.
सेव्ह म्हादई मंचने या अगोदर जाहीर केल्याप्रमाणे जनमत कौलदिनी 16 जानेवारीला होणारी सभा साखळीतच दुपारी 4 वाजता होईल. पालिकेने केवळ साखळीतील मैदानाची परवानगी मागे घेतली आहे. म्हणून ही सभा आता विर्डी-आमोणा पुलाशेजारील मोकळ्या मैदानावर घेण्याचे ठरवले आहे. तमाम गोवेकरांनी या सभेला हजेरी लावावी, असे आवाहन त्यांनी केले.
सेव्ह म्हादई मंचचे सदस्य हृदयनाथ शिरोडकर म्हणाले, आमचा लढा हा म्हादईसाठी आहे. आम्ही राजकारण करण्यासाठी लढाई लढत नाही. कर्नाटकविरोधात हा संघर्ष सुरू आहे. या विषयात आम्हाला राज्य सरकारनेच पाठिंबा द्यायला हवा होता.
दिल्लीवरून गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पहिले काम सभा रद्द करण्याचे केले. 9 जानेवारी रोजी आम्ही साखळी पालिकेकडे परवानगी मागितली. तीन दिवसांनंतर आम्हाला परवानगी मिळाली आणि लगेच ती मागेही घेतली. यावरून सरकारचे धोरण काय ते स्पष्ट होते, असे शिरोडकर म्हणाले.
राजकीय दबाव नाहीच!
‘म्हादई बचाव'' सभेला दिलेली परवानगी मागे घेण्यामागे कोणताही राजकीय दबाव किंवा मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप नाही. वस्तुस्थिती जाणून न घेताच सभेची परवानगी मागे घेतल्याप्रकरणी आंदोलकांकडून ''म्हादई''च्या नावाखाली दिशाभूल करण्यात येत आहे, असे नगरसेवक आनंद काणेकर आणि दयानंद बोरयेकर म्हणाले.
सभेची परवानगी मागे घेतल्यामुळे सध्या आंदोलकांकडून विविध आरोप होऊ लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर साखळी व्यापारी संघटना आणि भाजप समर्थक नगरसेवकांनी शुक्रवारी डिचोलीत पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली.
सिद्धरामय्या उवाच
आतापर्यंत कर्नाटकातील सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांनी म्हादईप्रश्नी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यात आता माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही उडी घेतली आहे. म्हादई प्रकल्पाबाबत केंद्र सरकार दुहेरी भूमिका बजावत असून हा खेळ थांबवून केंद्राने स्पष्ट भूमिका घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या भेटीनंतर केंद्राने गोेवा सरकारच्या दबावाला बळी पडून डीपीआरची मंजुरी मागे घेऊ नये, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.आतापर्यंत कर्नाटकातील सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांनी म्हादईप्रश्नी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यात आता माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही उडी घेतली आहे.
म्हादई प्रकल्पाबाबत केंद्र सरकार दुहेरी भूमिका बजावत असून हा खेळ थांबवून केंद्राने स्पष्ट भूमिका घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या भेटीनंतर केंद्राने गोेवा सरकारच्या दबावाला बळी पडून डीपीआरची मंजुरी मागे घेऊ नये, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
मुख्याधिकारी भाजपचे कार्यकर्ते!
गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत म्हणाले की, साखळीचे मुख्याधिकारी कबीर शिरगावकर हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. मात्र, तुम्ही सरकारी कर्मचारी म्हणून शपथ घेतली आहे, तुम्ही जनतेचे सेवक आहात.
तुम्ही जनतेच्या प्रश्नासाठी जनतेसोबत राहणे आवश्यक आहे. मात्र, तुम्ही ‘म्हादई बचाव’ सभेला दिलेली परवानगी मागे घेतल्याचा आदेश काढला. तुमच्या या निर्णयांमुळे आम्ही मुळीच घाबरणार नाही. ही सभा साखळीतच होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.