Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Air India Plane Crash: गोवा सरकारकडून एअर इंडिया विमान दुर्घटनेतील मृतांना आदरांजली; राजकीय दुखवट्याची घोषणा

Goa Government mourning Air India Crash: गोवा सरकारने 13 जून 2025 रोजी म्हणजेच उद्या (शुक्रवारी) राज्यभर एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला.

Manish Jadhav

पणजी: अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा गुरुवारी (12 जून) उड्डाणानंतर काही अंतरावर भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल 241 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यूही झाला. या दुर्घटनेवर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी होत गोवा सरकारने एक मोठा निर्णय घेतला.

राजकीय दुखवटा जाहीर

दरम्यान, गोवा सरकारने 13 जून 2025 रोजी म्हणजेच उद्या (शुक्रवारी) राज्यभर एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला. सरकारकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, या दिवशी सर्व शासकीय कार्यक्रम, सार्वजनिक समारंभ तसेच अधिकृत स्वरुपातील सर्व मनोरंजनाच्या कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली आहे किंवा ते पुढे ढकलण्यात आले आहेत.

सामूहिक श्रद्धांजली आणि प्रार्थनांचे आयोजन

राज्य सरकारने सर्व नागरिकांना सहानुभूतीपूर्वक आणि संवेदनशीलतेने या दिवसाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय, मृतांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी सामूहिक श्रद्धांजली आणि प्रार्थनांचे आयोजन करण्याचे आवाहन देखील करण्यात येणार आहे.

दुसरीकडे, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT