Air India plane crash: 242 प्रवासी दगावल्याची भीती! एअर इंडिया विमान अपघाताचे फोटो, व्हिडिओ पाहा

Ahmedabad Plane Crash: विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे एअर इंडिया विमानाचा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Ahmedabad Gujrat Air India Plane Crash
Ahmedabad Air India Plane CrashDainik Gomantak
Published on
Updated on

गुजरात: अहमदाबाद येथून लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळून गुरुवारी (१२ जून) मोठा अपघात झाला आहे. विमानातून २४२ प्रवासी प्रवास करत होते. विमानतळावरुन टेकऑफनंतर अवघ्या 5 मिनिटांतच हे विमान मेघानीनगर हॉर्स कॅम्प परिसरात कोसळले. विमानातील अनेक प्रवासी दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Air India plane crash
Air India plane crash

अहमदाबाद विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत विमान मेघानीनगर हॉर्स कॅम्प परिसरात कोसळले. यात २४२ देशी आणि विदेशी प्रवासी होते. या दुर्घटनेत अनेक प्रवासी दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

एअर इंडियाच्या या विमान दुर्घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, उड्डाण केल्यानंतर विमान इमारतीवर कोसळत असल्याचा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

Ahmedabad Gujrat Air India Plane Crash
Underage Girls Assault : ईदच्या पार्टीला बोलावून मित्राने घात केला, बर्थडे केक कापून 2 बहिणींसह एका अल्पवयीन मुलीवर दोघांकडून बलात्कार
Air India plane crash
Air India plane crash

या विमानात २४२ प्रवासी होते, यातील १६९ भारतीय, ५३ ब्रिटीश, ०१ कॅनडा आणि ०७ पोर्तुगीज प्रवासी नागरिक होते. तसेच, दोन पायलट आणि १० क्रू यांचा समावेश होता. याच विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी देखील प्रवास करत होते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Air India plane crash
Air India plane crash

दुर्घटनेत विमानाचे तुकडे झाले असून, याचे फोटो आता समोर आले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर विमानाचे चार भाग झाले आहेत.

Air India plane crash
Air India plane crash

सध्या दुर्घटना घडलेल्या ठिकाणी बचावकार्य सुरु असून, जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल केले जात आहे. अग्निशमन दल, एनडीआरएफ, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातग्रस्त इमारतीतील नागरिक देखील जखमी झाले आहेत.

विमान अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांनी चिंता व्यक्त केली आहे. मोदी आणि शहा लवकरच अहमदाबाद येथील घटनास्थळी दाखल होऊन घटनेची माहिती घेणार आहेत.

Ahmedabad Gujrat Air India Plane Crash
बारा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या गोव्यातील व्यक्तीचा उत्तर प्रदेशमध्ये खून, फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
Air India plane crash
Air India plane crash

इमारतीला विमान धडकल्यानंतर वस्तीगृहातील वास्तव्यास असणारे डॉक्टर देखील जखमी झाले आहेत. अपघातानंतर हवेत मोठेच्या मोठे आगीचे लोळ आणि धुराचे लोळ पसरले होते. यानंतर परिसरात सफेद रंगाच्या राखेची चादर पसरल्याचे दिसून आले. भागातील अनेक वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. विमान इमारतीवर कोसळल्याने इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे.

Air India plane crash
Air India plane crash

या दुर्घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोळ पसरले आहेत. विमानाचेे अशरक्ष: शेकडो तुकडे झाले आहेत. अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याचे भीती वर्तवली जात आहे.

हा विमान अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, विमानातून एटीसीला मेडे कॉल देण्यात आला होता पण, एटीसीने केलेल्या कॉलला विमानाने कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता, अशी माहिती समोर येत आहे.

Air India plane crash
Air India plane crash

घटनास्थळी बचावकार्य सुरु असून, जखमींंना रुग्णालयात दाखल करण्यासाठी लगबग सुरु आहे. राज्य आणि केंद्रीय बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com