Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

Rishabh Pant Quits LSG Captaincy: इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या हंगामात गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानी राहिलेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघातून एक मोठी बातमी समोर आली.
Rishabh Pant Quits LSG Captaincy
Rishabh PantDainik Gomantak
Published on
Updated on

Rishabh Pant Quits LSG Captaincy: इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या हंगामात गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानी राहिलेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघातून एक मोठी बातमी समोर आली. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने लखनऊ सुपर जायंट्स संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. या हंगामातील अत्यंत खराब आणि निराशाजनक कामगिरीची जबाबदारी स्वीकारत पंतने तात्काळ कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला.

लखनऊ सुपर जायंट्सच्या व्यवस्थापनाने शुक्रवारी (29 मे) सोशल मीडियावर एक अधिकृत पोस्ट शेअर करुन या वृत्ताला दुजोरा दिला असून ऋषभ पंतची कर्णधारपद सोडण्याची विनंती त्यांनी मान्य केली असल्याचे सांगितले. आयपीएल 2025च्या लिलावादरम्यान लखनऊने तब्बल 27 कोटींची विक्रमी बोली लावून पंतला आपल्या ताफ्यात सामील केले होते, त्यामुळे तो फ्रँचायझीसाठी एक ड्रीम साइनिंग ठरला होता. मात्र, कर्णधार म्हणून त्याचा लखनऊमधील प्रवास यशस्वी ठरु शकला नाही.

Rishabh Pant Quits LSG Captaincy
GT vs RR IPL 2026 Qualifier 2: गुजरात की राजस्थान? पावसामुळे सामना रद्द झाल्यास फायनलचं तिकीट कुणाला? पाहा काय सांगतो IPL चा नियम

लखनऊ सुपर जायंट्सने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले की, ऋषभ पंतने फ्रँचायझीकडे कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती. फ्रँचायझीने त्याचा हा निर्णय त्वरित प्रभावाने स्वीकारला. पंतच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन हंगामात लखनऊचा संघ प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यात अपयशी ठरला. विशेषतः यंदाच्या हंगामात लखनऊच्या संघाची कामगिरी अत्यंत सुमार झाली आणि संघ थेट गुणतालिकेत तळाला राहिला. या हंगामात खेळलेल्या 14 सामन्यांपैकी लखनऊला केवळ 4 सामने जिंकता आले, तर तब्बल 10 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला.

Rishabh Pant Quits LSG Captaincy
IPL Qualifier 1 Bengaluru vs Gujarat: गुजरातचं टेन्शन वाढलं! क्वालिफायर-1 पूर्वी RCB च्या संघात 'या' मॅचविनर खेळाडूची एन्ट्री; बंगळुरूला मोठा दिलासा

यापूर्वी, 2025 च्या आयपीएल हंगामातही पंतच्या नेतृत्वाखाली लखनऊची कामगिरी उल्लेखनीय झाली नव्हती. त्या हंगामात संघाने 14 पैकी केवळ 6 सामने जिंकले होते. एकूणच विचार केला तर, गेल्या दोन हंगामात ऋषभ पंतच्या नेतत्वाखाली लखनऊने एकूण 28 सामने खेळले, ज्यापैकी त्यांना केवळ 10 सामन्यांमध्येच विजय मिळवता आला, तर 18 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करवा लागला. या सलग अपयशामुळे आणि वाढत्या दबावामुळे अखेर पंतने कर्णधारपद सोडण्याचा मोठा निर्णय घेतला. आता आगामी हंगामात लखनऊच्या संघाचे नेतृत्व कोणाकडे सोपवले जाते, याकडे क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com