पणजी: डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील गोवा सरकारने रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना टेम्पररी स्टेट्स दिला जाणार असून, यापुढे रोजंदारीवर भरती होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना अनुभवानुसार फिक्स पगार मिळणार आहे.
सरकारी खाती, महामंडळे, पालिकांमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना टेम्पररी स्टेट्स मिळणार आहे. निवृत्तीनंतर पात्र कर्मचाऱ्यांना निवृत्त वेतन देखील मिळणार आहे. राज्यात रोजंदारीवर काम करणारे सुमारे तीन हजार कर्मचारी असून, त्यांना हा लाभ मिळणार आहे. सात वर्षे काम केलेल्या कर्मचाऱ्यांना २० ते २५ हजार रुपये तर २० वर्षे काम केलेल्या कर्मचाऱ्यांना ४० हजार रुपये वेतन मिळणार आहे.
कोणाला किती रुपये वेतन मिळणार
१) क्लिनर, हेल्पर, लेबर, गार्ड, वॉचमन, एमटीस आणि समकक्ष कर्मचाऱ्यांना एकूण २१,८०० रुपये पगार मिळेल, त्यातील १,९५० / १,८०० पीएफ जमा होऊन २० हजार रुपये वेतन मिळेल.
२) तर, एलडीसी कारकून कर्मचारी, ड्रायव्हर, इलेक्ट्रिशिएन, वायरमन, पंप ऑपरेटर, पेंटर, वेल्डर, प्लंबर आणि समकक्ष कर्मचाऱ्यांना एकूण २६,८०० पगारापैकी १,९५० / १,८०० पीएफ जमा होऊन २५,००० रुपये वेतन मिळेल.
सध्या राज्यातील रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना १२,८१८ रुपये नियमित कामाप्रमाणे वेतन मिळते. यात दररोज मिळणारा रोज यात बदल झाल्यास वेतनाची रक्कम वाढते. पण, आत सात वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना आता फिक्स वेतन मिळणार असून, यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. शिवाय पीएफ आणि निवृत्त वेतन यासारख्या तरतूदीमुळे भविष्यासाठी देखील आधार मिळणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.