Chapora Fort: 'विकासासाठी काँग्रेस सोडून लोबोंनी भाजपमध्ये प्रवेश केला'; शापोरा किल्ल्याच्या मुद्दावरुन सरदेसाईंचा सरकारला टोमणा

Goa Assembly Monsoon Session 2025: खादी दुर्घटना घडल्यास राज्यासाठी ती लाजीरवाणी गोष्ट असेल, वर्क ऑर्डर कधी देणार याची मंत्र्यांनी माहिती द्यावी, असा प्रश्न शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांनी विचारला.
Goa Assembly Monsoon Session 2025 | Goa News
Vijai Sardesai And DeliaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात राज्यातील ऐतिहासिक शापोरा किल्ल्यावर चांगलीच चर्चा रंगली. दिलायला लोबोंनी या किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असल्याचे सांगताना सरकारकडून वारंवार तारखा दिल्या जात असल्याचे नमूद केले. तसेच, यासाठी वर्क ऑर्डर कधी दिली जाणार? असा प्रश्न केला. यावेळी सरदेसाईंनी लोबो यांनी विकासासाठी पक्षांतर केले तरी त्यांना सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याचा टोला लगावला.

“शापोरा हा गोव्यातील महत्वाचा ऐतिहासिक किल्ला आहे. किल्ल्याच्या जीर्णोद्धाराबाबत वारंवार प्रश्न विचारण्यात आला. मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानुसार यासाठी दोन कोटी ६२ लाख खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले. पण, गेल्या दोन वर्षापासून अर्थ खाते आणि बांधकाम विभागाकडे फाईल मंजुरीसाठी प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.”

“किल्ल्यावरील दगड हालू लागले असून, एखादी दुर्घटना घडल्यास राज्यासाठी ती लाजीरवाणी गोष्ट असेल, वर्क ऑर्डर कधी देणार याची मंत्र्यांनी माहिती द्यावी,” असा प्रश्न शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांनी विचारला.

Goa Assembly Monsoon Session 2025 | Goa News
Goa Assembly Session: लोकशाहीची हत्या तुम्ही केली! सभागृहात विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्री सावंत यांच्यात शाब्दिक टोलेबाजी

किल्ल्यासाठी यापूर्वी ५.७७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. अनेक अडचणींनंतर यासाठी ३ कोटी ३० लाख २८ हजार ९३८ रुपये मंजूर करण्यात आले असून, ही फाईल अर्थ खात्याकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे, अशी माहिती पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले.

किल्ल्यावरील सौंदर्यीकरण, गॅलरी यासारखी कामे येत्या दोन महिन्यात सुरु केली जातील, असे आश्वासन मंत्री फळदेसाई यांनी दिले. किल्ल्याच्या भोवती असणारी अवैध दुकाने हटविण्यासाठी आमदार आणि मुख्यमंत्री यांनी परवानगी द्यावी, अशी विनंती फळदेसाईंनी केली.

येथून सरकारला महसूल मिळावा यासाठी उपयायोजना देखील केल्या जात आहेत, अशी माहिती फळदेसाईंनी सभागृहात दिली.

अर्थ खात्याकडून मंजुरी मिळताच १५ दिवसांत वर्क ऑर्डर दिली जाईल, असे मंत्री म्हणाले. मंत्री फळदेसाईंनी स्वत: अर्थ खात्याकडून फाईल मंजूर करुन घ्यावी असा सल्ला माजी मंत्री नीलेश काब्राल यांनी दिला.

Goa Assembly Monsoon Session 2025 | Goa News
Goa: ‘गोवा ऑलिंपिक भवन’ कधी होणार? 5 वर्षांपासून प्रयत्न; केंद्रीयमंत्री नाईक अध्यक्ष असूनही अपयश

विकासासाठी काँग्रेस सोडून दिलायला लोबोंनी भाजपमध्ये प्रवेश केला

विजय सरदेसाईंनी यावेळी दिलायला लोबोंनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला असताना त्यांना सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याचा टोला लगावला. यावेळी सरदेसाईंनी मराठी विचारतो असे म्हणत, केव्हा त्यांना आश्वासन देणार? असा प्रश्न केला.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत बोलताना अधिवेशन संपण्यापूर्वी मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com