Sanjivani Sugar Factory Dainik Gomantak
गोवा

Sanjeevani Sugar Factory : सरकारकडून केवळ सहा महिन्यांसाठीच अनुदान, कामगारांवर टांगती तलवार कायम

संजीवनी प्रकल्पाच्या वीज, पाणी व इतर कामासाठी हे अनुदान देण्यात आले

गोमन्तक डिजिटल टीम

Sanjeevani Sugar Factory : दयानंदनगर-धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्याच्या विषयावरून गेले काही दिवस रणकंदन सुरू आहे. ऊस उत्पादकांचे आंदोलन त्यानंतर पगार वेळेवर मिळाला नाही आणि कामावरून कमी करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे संजीवनीच्या कायमस्वरूपी व कंत्राटी कामगारांनी गेल्या आठवड्यात आंदोलन छेडले आणि सरकारला हा प्रश्‍न प्राधान्यक्रमाने हाती घ्यावा लागला.

त्यामुळेच संजीवनीच्या आर्थिक अनुदानाची मुदत आता सहा महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे.हे अनुदान पुढील सहा महिने किंवा जोपर्यंत कामगारांना स्वेच्छा निवृत्ती लागू होत नाही, तोपर्यंत देण्यात येईल, असे वित्त खात्याने स्पष्ट केले आहे.

शेवटी कामगारांवर टांगती तलवार कायम राहिली आहे. सद्यःस्थितीत संजीवनी कामगारांच्या पगारावर महिन्याकाठी साडे सत्तेचाळीस लाख रक्कम तर पाणी, वीज आदी देखभालीवर दीड लाख रुपये खर्च करावे लागतात.

सरकारने संजीवनी साखर कारखान्यासाठी सहा महिने अनुदान जाहीर केल्यानंतर गेले तीन महिने पगाराविना असलेल्या संजीवनीच्या कामगारांचा पगार शेवटी झाला.

संजीवनीच्या कायमस्वरूपी व कंत्राटी कामगारांचा पगार आणि संजीवनी प्रकल्पाच्या वीज, पाणी व इतर कामासाठी हे अनुदान देण्यात आले आहे. आता हे सहा महिने एप्रिलपासून धरण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT