Goa government aerial bunch cable inquiry Dainik Gomantak
गोवा

Aerial Bunch Cable: 145 कोटींच्या 'बंच केबल' चौकशीसाठी नवी समिती, अध्यक्षपदी डॉ. व्ही. कंदवेलू; पर्यावरण सचिव मिश्रा यांचाही समावेश

Electricity Department Goa: गोवा सरकारने वीज खात्यातील एरियल बंच केबल या १४५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाची चौकशी करण्यासाठी नव्याने समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोवा सरकारने वीज खात्यातील एरियल बंच केबल या १४५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाची चौकशी करण्यासाठी नव्याने समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीच्या अध्यक्षपदी मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू असून, तटस्थ सदस्य म्हणून पर्यावरण सचिव अरुण कुमार मिश्रा यांचा समावेश केला जाणार आहे.

वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने दोनवेळा समिती कार्यरत होऊ शकली नाही. आता पुन्हा समिती स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

यासाठी सरकारी मान्यतेसाठी फाईल पाठवण्यात आली असून, मान्यता मिळताच अधिसूचना जारी करण्यात येईल. वीज खंडित होण्याचे प्रकार कमी करण्यासाठी २०१७ मध्ये हा प्रकल्प राबवण्यात आला होता.

अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे रखडली कार्यवाही

१४५ कोटींचा एरियल बंच केबल प्रकल्प चौकशीखाली

मुख्य सचिव समितीचे अध्यक्ष, पर्यावरण सचिव तटस्थ सदस्य

अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे दोनदा समिती कार्यरत होऊ शकली नाही

अनेक ठिकाणी केबल निकामी, खात्याचे मोठे नुकसान

दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याची सक्ती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain Update: गोमंतकीयांनो सावधान! पुढील काही दिवस पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारी

New Water Pipelines: '..नव्या जलवाहिन्यांसाठी 2 हजार कोटी लागतील'! मंत्री फळदेसाईंनी दिली माहिती

Rabies Free Goa: रेबीज नियंत्रणात गोवा अव्वल! 2019 पासून एकही रुग्ण नाही; ठरले भारतातील एकमेव राज्य

Rama Kankonkar: काणकोणकर हल्लाप्रकरणी सूत्रधार कोण? PM मोदींना देणार निवेदन; पोलिसांची ‘रासुका’ लावण्यासाठी हालचाल

India vs Pakistan: कुलदीपच्या 'फिरकी'ची जादू! फायनलमध्ये इतिहास रचण्याची संधी, क्रिकेटच्या इतिहासात कधीच असं घडलं नाही

SCROLL FOR NEXT