financial aid Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: गोव्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना सरकारचा दिलासा; भरपाई योजनेअंतर्गत मिळणार लाखो रुपयांची मदत

Accident Compensation Scheme: गोवा सरकारला या उपक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक पीडित लोकांपर्यंत आर्थिक मदत पोहोचवायची आहे

Akshata Chhatre

पणजी: सध्या गोव्यात रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या अपघातांमुळे गोव्यातील अनेक कुटुंब आर्थिक अडचणीत सापडत आहेत आणि त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर निर्माण झालाय आणि याच पार्श्वभूमीवर गोवा सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गोवा सरकारला या उपक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक पीडित लोकांपर्यंत आर्थिक मदत पोहोचवायची आहे.

गोवा सरकारने रस्ते अपघात पीडितांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी गोवा राज्य अपघात भरपाई योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबाला २ लाख, कायमचे अपंगत्व असल्यास १.५ लाख, आंशिक अपंगत्व असल्यास १ लाख, तर किरकोळ दुखापत झाल्यास १५,००० रुपये दिले जाणार आहेत. याशिवाय, अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबांना तात्पुरती मदत म्हणून ५०,००० तर गंभीर जखमींसाठी २५,००० रुपये एवढी रक्कम मदत म्हणून दिली जाणार आहे.

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नियम व अटी:

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपघात गोव्याच्या हद्दीत घडलेला असला पाहिजे आणि अर्ज अपघात झाल्यानंतर ७ दिवसांच्या आत सादर करणं महत्वाचं असणार आहे. अर्जदाराने किंवा त्याच्या कुटुंबाने निश्चित उत्पन्न निकष पूर्ण केले पाहिजेत. अर्ज प्रक्रियेसाठी परिवहन संचालनालयाच्या www.goaonline.com या अधिकृत संकेतस्थळावर दिलेला अर्ज भरून, परिवहन संचालक, गोवा परिवहन संचालनालय यांच्याकडे सादर करावा लागेल.

सरकारने रस्ते अपघातातील पीडितांना तत्काळ मदत मिळावी यासाठी ही योजना सुरू केली असून, संबंधितांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज करणे गरजेचे आहे. मागील १४ वर्षांचा आढावा घेतल्यास, आतापर्यंत ३८२ लोकांनी या योजनेचा लाभ घेतला असून एकूण ७ कोटी ४४ लाख ५० हजार रुपये या योजनेतून सरकारतर्फे देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोठा आवाज, टिंटेड गाडी आणि जीवघेणी स्टंटबाजी! गोव्यात प्रसिद्ध इन्फ्लुएंसरची मॉडिफाईड BMW जप्त

MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल'च्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! एमएस धोनी IPL 2026 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Horoscope: 2026 साठी काहीच दिवस बाकी! शनि-गुरूच्या हातात नशिबाचे चक्र, 'या' राशींना मिळणार भाग्याची खास साथ; मात्र काहींना साडेसातीचा धोका फार

अग्रलेख: फोंड्यात रविंचा उत्तराधिकारी कोण?

कष्टकरी वर्गाच्या आवाजाला मिळाली ताकद, झोहरान ममदानी ठरले आशेचे प्रतीक - संपादकीय

SCROLL FOR NEXT