Gomantak Bhandari Samaj Dainik Gomantak
गोवा

Gomantak Bhandari Samaj: समांतर समितीसाठी नेत्यांची शोधा-शोध! नावे अद्याप गुलदस्त्यात; कार्यभार उरकण्यासाठी भंडारी नेत्यांचा रेटा

Gomantak Bhandari community forms new parallel committee: गोमंतक भंडारी समाजाला समांतर समितीत काम करण्यासाठी आता नेत्यांची शोधाशोध करण्याची वेळ आली आहे. ही समिती स्थापन व्हावी, यासाठी कार्यरत असलेल्या गटाने याच आठवड्यात समिती स्थापन केली जावी, यासाठी रेटा वाढवला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोमंतक भंडारी समाजाला समांतर समितीत काम करण्यासाठी आता नेत्यांची शोधाशोध करण्याची वेळ आली आहे. ही समिती स्थापन व्हावी, यासाठी कार्यरत असलेल्या गटाने याच आठवड्यात समिती स्थापन केली जावी, यासाठी रेटा वाढवला आहे.

गोमंतक भंडारी समाज संघटनेला पर्यायी अशी समिती स्थापन करण्यासाठी मंगळवारचा दिवस निवडण्यात आला होता. त्या प्रस्तावित समितीमधील अनेकांनी माघार घेतल्याचे वृत्त ‘गोमन्तक’ने देताच नव्याने नावांची शोधाशोध सुरू करण्यात आली आहे. ती समिती स्थापन व्हावी, यासाठी सक्रिय असलेल्या नेत्याने दिवसभरात काहींच्या घरी जात समितीचे सदस्यत्व स्वीकारावे, अशी गळ घातल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

गोमंतक भंडारी समाज संघटनेच्या अध्यक्षपदी देवानंद नाईक यांची निवड झाल्यानंतर ही समिती स्थापन करण्याचा विचार बळावत गेला आहे. भंडारी समाज राजकीय व सामाजिकदृष्ट्या प्रबळ ठरू शकतो, असे दिसून आल्याने त्यात फूट पाडण्यासाठी समांतर समितीच्या विचारांना अलीकडे बळ देण्यात येऊ लागले आहे. त्यातूनच मंगळवारी ही समिती जाहीर करण्यासाठी वेळ निवडण्यात आली होती. मात्र, ती पुढे ढकलण्याची वेळ आली.

गोमंतक भंडारी समाज संघटनेचे अध्यक्ष देवानंद नाईक म्हणाले, काही जणांना समाजात फूट पडलेली हवी आहे. समाज एकसंघ राहिला तर राजकीय व इतर हक्क मागितले जातील, याची भीती काहींना आहे. आमच्यापैकी काहीजण जातनिहाय जनगणनेसाठी निवेदने देत आहेत. ते कोणत्या अधिकारात अशी निवेदने देत आहेत ते त्यांचे त्यांनाच ठाऊक. भंडारी समाज हा इतर मागासवर्गीयांत असल्याने त्यात समावेश असलेल्या १९ समाजांनी ती मागणी केली पाहिजे. भंडारी समाजाची आमसभा मे मध्ये बोलावण्यात येणार आहे. त्याला कितीजण उपस्थित राहून मागणीचे समर्थन करतील त्यावरच बरेच काही अवलंबून आहे, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT