
Gomantak Bhandari Samaj Election Dispute
पणजी: गोमंतक भंडारी समाज निवडणुकीबाबत ‘जैसे थे’ चा आदेश देऊनही निवडणूक झाली आणि नव्या समितीने कार्यभार स्वीकारल्याची गंभीर दखल जिल्हा संस्था निबंधकांनी घेतली आहे. या प्रकरणी तक्रारदार आणि प्रतिवादी यांना ६ डिसेंबर पर्यंत म्हणणे मांडण्यासाठी मुदत देण्यात आली असून ९ डिसेंबर रोजी युक्तीवाद करता येणार आहेत.
गोमंतक भंडारी समाजाचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असुन पणजी जिल्हा निबंधकांकडे याप्रकरणी सुनावणी चालु आहे. निबंधकांनी अशोक नाईक गटाला कोणतीही कृती करण्यास बंधनं घातली असताना तसेच समाजाची निवडणूक घेण्यास स्थगिती दिली असतानाही रामदास पेडणेकर यांनी निबंधकांचा आदेश धुडकावून आपले मावसभाऊ देवानंद नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बेकायदा निवडणूक घेऊन स्वघोषित समीती जाहिर केली आहे.
याला निबंधकांकडे आव्हान दिले असून निबंधकांनी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यासंबंधी ६ डिसेंबर रोजी सुनावणी ठेवली असुन संबंधितांनी आपली बाजु मांडण्यास सांगितले आहे. या संस्थेच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत पोलिसात तक्रारी दाखल केलेल्या आहेत. आता अशोक नाईक व देवानंद नाईक विरोधी गट पुढील रणनीती ठरविण्यासाठी भंडारी समाज बांधवांची एक बैठक आता लवकरच आयोजित होणार अशी माहिती मिळाली आहे.
देवानंद नाईक यांनी डिसेंबर महिन्यात मासिक बैठक बोलावली असून ही बैठक बेकायदेशीर आहे, असा दावा विरोधी गटाकडून केला जात आहेत. नवी केंद्रीय समिती तसेच बाराही तालुका समिती निवडणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे, त्याचबरोबर मासिक आर्थिक व्यवहारालाही मान्यता मिळविण्यासाठी ते अशा बैठकांचे आयोजन करत आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही देवानंद नाईक यांचे हे कृत्य बेकायदेशीर आहे, असा मुद्दा त्यांच्या विरोधकांकडून जिल्हा निबंधकांसमोर मांडण्यात येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.