पिडीत पिळगावकर कुटुंबिय
पिडीत पिळगावकर कुटुंबिय Dainik Gomantak
गोवा

'आम्हाला न्याय मिळवून द्या' पिळगावकर कुटुंबाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Siddhesh Shirsat

Goa: पिळगाव (Pilgaon) येथील मारहाण प्रकरणाची गृहमंत्री या नात्याने राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Dr Pramod Sawant) यांनी गांभीर्याने दखल घ्यावी. या अमानुष मारहाण प्रकरणाची 'सीबीआय' चौकशी (CBI's inquiry) करावी. आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी मारहाण झालेल्या पिडीत पिळगावकर कुटुंबियातील (Victim Pilgaonkar Family) युवती श्रुष्टी पिळगावकर हिने आज मंगळवारी डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी तिच्यासमवेत तीचे वडील सुनील आणि बहीण समता पिळगावकर उपस्थित होती. मारहाणीचा हा प्रकार मालमत्तेच्या वादातून नव्हे, तर क्षुल्लक कारणावरून घडला आहे, असेही श्रुष्टी हिने म्हटले आहे.

अमानुषपणे मारहाण

गेल्या बुधवारी 12 रोजी तारवाडा पिळगाव येथे मारहाणीचा हा प्रकार घडला आहे. आम्ही आणलेले दगड नेण्यास हरकत घेतल्यानेच पिळगावचे पंच स्वप्नील फडते आणि त्यांचे बंधू मनोहर फडते यांनी आपणासहित आपली आई, बहीण, काका आणि इतरांवर अमानुषपणे हल्ला चढवला. हल्ला करताना त्यांनी महिलांची विचार केला नाही. आमचा विनयभंगही केला. हल्ला करतानाची फडते बंधूंची आक्रमकता पाहता, केवळ दैव बलवत्तर म्हणून आम्ही बचावलो. असे श्रुष्टी पिळगावकर हिने सांगितले. पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंद करून संशयित फडते बंधूना अटक केली. संशयितांची सध्या सशर्त जामिनावर सुटका करण्यात आली आहे. आमच्यावर झालेला हल्ला पाहता, भविष्यात त्याची पुनरवृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी भीती श्रुष्टी पिळगावकर आणि तिच्या कुटुंबियाने व्यक्त केली आहे.

अपात्र करा

आमच्यावर अमानुषपणे हल्ला करणारे स्वप्नील फडते हे पिळगाव पंचायतीचे विद्यमान पंच आहेत. मारहाणीसारखे कृत्य करणाऱ्या स्वप्नील फडते यांना पंच पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांना अपात्र करावे. अशी मागणीही पिळगावकर कुटुंबियाने केली आहे. पंचायत खाते आणि स्थानिक पंचायतीला मारहाण प्रकरणाची कल्पना देण्यात आली आहे. राज्य महिला आयोगालाही मेल पाठवून या घटनेची माहिती देण्यात आली आहे. असे श्रुष्टी पिळगावकर हिने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News : लोकसभा निवडणूक २०२४; मगोपची सावईवेरे येथे प्रचार सभा

Kolem News :कुळे, बेळगावहून येणाऱ्या चालत्या ट्रकला आग, ३२ लाखांचे नुकसान

Pakistan Road Accident: पाकिस्तानात भीषण अपघातात, 20 ठार 15 जखमी; बचावकार्य सुरु

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

SCROLL FOR NEXT