आमदारांनी राजीनामा न देताच केला दुसऱ्या पक्षात बेकायदेशीर प्रवेश

जर पूर्ण पक्षच (party) दुसऱ्या पक्षात विलिन झाला तर त्या आमदारांची आमदारकी (MLA) अबाधित राहू शकते अशी लोकप्रतिनिधी कायद्यात तरतूद आहे.
मुंबई उच्च न्यायालय
मुंबई उच्च न्यायालयDainik Gomantak

पणजी: काँग्रेस (Congress) व मगो पक्षातून भाजपमध्ये (BJP) प्रवेश केलेल्या 12 आमदारांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केलेल्या आमदार अपात्रता याचिकेवरील अंतिम सुनावणी 22 ऑक्टोबरला ठेवण्यात आली आहे. काँग्रेसतर्फे गिरीश चोडणकर (Girish Chodankar) तर मगोतर्फे सुदिन ढवळीकर यांनी दोन वेगवेगळ्या याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी होणार आहे.

2019 मध्ये मगोच्या तीन आमदारांपैकी (MLA )दिपक पावस्कर व मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर यांनी आमदारकीचा राजीनामा न देता तसेच मगो पक्ष भाजपमध्ये विलिन झाल्याचा दावा करून प्रवेश केला होता. त्याला ढवळीकर यांनी आव्हान दिले आहे. मगो पक्ष अजूनही अबाधित असून त्यानंतरच्या निवडणुका या पक्षावर लढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्या दोघांनी सभापतींकडे सादर केलेले पत्र खोटे व बनावट असल्याचा दावा करण्यात आला आहे.

मुंबई उच्च न्यायालय
सरपंचपदी गिरीश पिल्ले यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड

दरम्यान, गिरीश चोडणकर यांनी माजी दहा काँग्रेसच्या आमदारांविरुद्ध अपात्रता याचिका सादर केली आहे. या आमदारांनी राजीनामा न देताच केलेला प्रवेश बेकायदेशीर (Illegal) आहे. काँग्रेसचे दोन तृतियांश आमदार फुटले तरी मूळ काँग्रेस पक्ष भाजपमध्ये (BJP) विलिन झालेला नाही. जर पूर्ण पक्षच दुसऱ्या पक्षात विलिन झाला तर त्या आमदारांची आमदारकी अबाधित राहू शकते अशी लोकप्रतिनिधी कायद्यात (Act) तरतूद आहे. त्यामुळे हे सर्व 10 ही आमदार अपात्र ठरत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com