Goa Girls Ahead in 12th Result 2022 Dainik Gomantak
गोवा

गोव्यात सलग सहा वर्षे मुलींचीच अधिसत्ता

गोव्यात बारावीचा निकाल जाहीर : 94.58 टक्‍के मुली उत्तीर्ण, एकूण निकाल 92.66 टक्‍के

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. यावर्षीच्‍या परीक्षेमध्ये यंदाही मुलींनीच बाजी मारली. यावेळी 94.58 टक्‍के मुली उत्तीर्ण झाल्‍या, तर मुलांची टक्‍केवारी90.66 अशी आहे.

यापूर्वीही सलग पाच वर्षे मुलींनीच निकालात उच्चांक गाठला आहे. कोरोना महामारीच्‍या पार्श्वभूमीवर पूर्ण झालेल्‍या 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी 50 टक्‍क्‍यांचे सहा महिन्‍यांचे प्रथम सत्र आणि 50 टक्‍क्‍यांचे द्वितीय सत्र अशा दोन सत्रांत परीक्षा घेण्यात आल्‍या होत्या. इंटर्नल ॲसेसमेंट आणि दोन्‍ही सत्रांचे मिळून मार्क देण्यात आले असून यावर्षीही हीच पद्धत अवलंबली जाईल, असे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी सांगितले. यंदा कला, वाणिज्‍य, विज्ञान आणि व्‍यावसायिक विभागात एकूण 18,112 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी 16,783 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हा एकूण निकाल 92.66 टक्‍के आहे.

यावेळी 1,224 विद्यार्थ्यांना प्रगतीची आवश्‍यकता आहे, तर 105 निकाल राखून ठेवले आहेत. या परीक्षेस 21 खासगी विद्यार्थी बसले होते. पैकी 8 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण निकाल 38.10 टक्‍के लागला. आयटीआयमधून 26 विद्यार्थी होते. पैकी 18 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील 19 उत्तीर्ण झाले. याचा निकाल 63.33 टक्‍के लागला. 105 दिव्‍यांग विद्यार्थी होते. त्यातील 94 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

पर्वरी येथील मंडळाच्‍या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी निकालाची घोषणा केली. यावेळी शिक्षण सचिव मेराल्‍डिन मेंडिस, आयटी विभागाचे उपसचिव भरत चोपडे, सहसचिव शीतल कदम उपस्‍थित होते. भगीरथ शेट्ये यांनी ही परीक्षा प्रक्रिया यशस्‍वीपणे पूर्ण करण्यात योगदान दिलेल्‍या सर्व सरकारी खात्‍यांचे तसेच शिक्षक आणि पालकांचे आभार मानले. तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

कॉपी करणाऱ्या दोघांवर कारवाई

परीक्षेत कॉपी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना 1 हजार रुपयांचा दंड करण्यात आला. तसेच त्‍यांना संबंधित विषयात शून्‍य गुण देण्यात आले आहेत. त्‍यांच्‍या गुणपत्रिकेत कॉपी केल्‍याचा शेरा मारण्यात आला आहे. हॉल तिकिटावर लिखाण केलेल्‍या एका विद्यार्थ्यास समज देण्यात आली असून त्‍याच्‍या शाळेला त्‍याविषयी कळविले आहे. तर एका विद्यार्थ्याने काळ्या पेनने पेपर लिहिल्‍याचे आढळले. पण संबंधित विद्यार्थी नियमाविषयी अनभिज्ञ असल्‍याचे दिसून आल्‍याने त्‍याच्‍यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

https://www.youtube.com/watch?v=rKWMDHIoMaMतीन विद्यार्थ्यांना कोकणीत 100 गुण

कोकणी विषयाचा 99.50 टक्‍के निकाल लागला असून तीन विद्यार्थ्यांनी पैकीच्‍या पैकी गुण मिळवले आहेत. मराठीचा निकाल 99.40 असा लागला आहे. हिंदी विषयाचे ९९ टक्‍के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उर्दू 100 टक्‍के, संस्‍कृत 99.55, पोर्तुगीज 97.94, फ्रेंच 99.14, इंग्रजी 99.25, भौतिकशास्‍त्र 96.69 टक्‍के असा निकाल लागला आहे.

24 जून रोजी पुरवणी परीक्षा

या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्‍या विद्यार्थ्यांसाठी अंदाजे 24 जून रोजी पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ही परीक्षा घेतली जाते. अनुत्तीर्ण विषयात उत्तीर्ण झाल्‍यानंतर संबंधित विद्यार्थ्यास पुढील वर्गात याचवर्षी प्रवेश दिला जातो.

349 विद्यार्थ्यांना क्रीडा गुण

या परीक्षेत राज्‍यातील 349 विद्यार्थ्यांनी क्रीडा गुण मिळवले. पैकी केवळ 9 विद्यार्थी क्रीडा गुण घेऊन उत्तीर्ण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT