Goa Ghumat Aarti Dainik Gomantak
गोवा

Goa Ghumat Aarti: राज्यस्तरीय घुमट आरती स्पर्धेचा निकाल जाहीर; ‘महागणपती’ मंडळ प्रथम

महिला गटात ''गणपती’ कला संघ, तर बाल गटात ''गुरुदेव’मंडळ प्रथम

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Ghumat Aarti: फोंड्यातील राजीव गांधी कला मंदिरातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय घुमट आरती स्पर्धेत पुरुष गटात आमोणेच्या महागणपती आरती मंडळाला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला.

कलामंदिरतर्फे आयोजित महिला घुमट आरती स्पर्धेत तोर्डा पैठण साल्वादोर द मुंद येथील गणपती कला आणि सांस्कृतिक संघाला प्रथम तर बाल घुमट आरती स्पर्धेत बोरी येथील गुरुदेव साई बाल आरती मंडळाला अव्वल स्थान मिळाले.

बक्षीसवितरण कार्यक्रमाला कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे तसेच फोंड्याचे उपजिल्हाधिकारी सुयश खांडेपारकर, कला मंदिरच्या सदस्य सचिव स्वाती दळवी व उप कार्यक्रम अधिकारी सुनील केरकर आदी उपस्थित होते. गोविंद गावडे व सुयश खांडेपारकर यांनी विजेत्या पथकांचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन प्रदीप नाईक यांनी केले. सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे.

पुरुष गट - प्रथम महागणपती आरती मंडळ आमोणा, द्वितीय शिव भूमिका आरती मंडळ साळ, तृतीय विठ्ठल रखुमाई घुमट आरती मंडळ म्हापसा. उत्तेजनार्थ पहिले बक्षीस महामाया आरती मंडळ शिरोडा, दुसरे हेरंब घुमट आरती मंडळ धारगळ, तिसरे साई समर्थ घोगळेश्‍वर आरती मंडळ मडगाव.

उत्कृष्ट घुमट समूहवादन महागणपती आरती मंडळ आमोणा, उत्कृष्ट गायन संच शिव भूमिका आरती मंडळ साळ, उत्कृष्ट कासाळेवादक श्रीयश नाईक (महामाया आरती मंडळ शिरोडा), उत्कृष्ट समेळवादक वामन शिरोडकर (विठ्ठल रखुमाई आरती मंडळ म्हापसा)

महिला गट - प्रथम गणपती कला आणि सांस्कृतिक संघ तोर्ड पैठण - साल्वादोर द मुंद, द्वितीय युवा कला मोगी महिला आरती मंडळ तळावली - फोंडा, तृतीय व्याघ्रेश्‍वर आरती मंडळ खांडोळा . उत्तेजनार्थ पहिले बक्षीस दुर्गादेवी कला आणि सांस्कृतिक मंडळ काले - सांगे, दुसरे कटमगाळ दादा पंगड फोंडा, तिसरे शांतादुर्गा बोडगेश्‍वर महिला आरती मंडळ म्हापसा, उत्कृष्ट घुमट संच गणपती कला आणि सांस्कृतिक संघ तोर्ड पैठण - साल्वादोर द मुंद, उत्कृष्ट गायन रत्नदीप क्रीडा आणि सांस्कृतिक संघ, शिरोडा, उत्कृष्ट समेळवादक बिंदिया पोकळे (युवा कला मोगी तळावली), उत्कृष्ट कासाळेवादक साक्षी हळदणकर (व्याघ्रेश्‍वर आरती मंडळ, खांडोळा)

बाल गट - प्रथम गुरुदेव साई बाल आरती मंडळ, बोरी. द्वितीय केळबाय सातेरी बाल आरती मंडलर कुर्टी - फोंडा, तृतीय स्वर सातेरी बाल आरती मंडळ, चाफाड सावईवेरे. उत्तेजनार्थ प्रथम कटमगाळ दादा पंगड फोंडा. द्वितीय रत्नदीप क्रीडा व सांस्कृतिक संघ तरवळे - शिरोडा, तृतीय मल्लिकार्जून आरती मंडळ तामसुली.

उत्कृष्ट घुमट संच जय श्री हरी बाल मंडळ काले - सांगे. उत्कृष्ट गायन समूह गुरुदेव साई बाल आरती मंडळ बोरी. उत्कृष्ट कासाळेवादक दक्ष गावडे (केळबाय सातेरी बाल मंडळ कुर्टी), उत्कृष्ट समेळवादक ऋत्विक मालवणकर (गणपती कला आणि सांस्कृतिक संघ तोर्डा).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT