Panjim Municipality: ...अखेर मुहूर्त मिळाला! पणजी महानगरपालिकेचे लवकरच स्थलांतर होणार

महानगरपालिकेची सध्या इमारत फार जुनी असून तिची वयोमर्यादाही संपलेली आहे.
Panjim Municipal Corporation
Panjim Municipal CorporationDainik Gomantak

Panjim Municipality महानगरपालिकेची नवीन इमारत उभारण्याच्या कामाचा पायाभरणी शुभारंभ नुकताच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते पार पडला आहे.

नव्या आराखड्यानुसार नवी इमारत उभारण्यासाठी सध्याची इमारत हटवावी लागणार आहे. त्यासाठी येथील कामकाज दुसऱ्या ठिकाणाहून करावे लागणार असल्याने लवकरच ते स्थलांतर केले जाणार आहे.

महानगरपालिकेची सध्या इमारत फार जुनी असून तिची वयोमर्यादाही संपलेली आहे. त्यामुळे नव्या इमारतीची आवश्‍यकता गेली दहा ते पंधरा वर्षांपूर्वीपासून व्यक्त केली जात होती.

अखेर गेल्या महिन्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नव्या इमारतीचा पायाभरणी समारंभ केला. पण कामाला कधी सुरुवात होणार हे अद्यापि अधांतरीच आहे.

महानगरपालिकेच्या ज्या कार्यालयात स्थलांतर होणार आहे, त्या बांदोडकर मार्गावरील व्यावसायिक कर आयुक्त कार्यालयाच्या जुन्या इमारतीत किंवा इमेजिन पणजी स्मार्ट सिटी लिमिटेडच्या कार्यालयात जाणार आहे. त्या इमारतींची एनओसी सरकारकडून अद्यापि महानगरपालिकेला मिळालेली आहे.

...अखेर मुहूर्त! महानगरपालिकेच्या नव्या इमारतीचा विषय गेली दहा-पंधरा वर्षांपासून चर्चिला जात होता. माजी नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांच्या कारकिर्दीत महानगरपालिकेच्या नूतन इमारतीचा पायाभरणी समारंभ झाला होता. तेव्हा इमारतीचे काम मार्गी लागणार असे वाटत होते, परंतु ते या-ना त्या कारणाने ते रखडले गेले आणि यावर्षी त्याला मुहूर्त मिळाला.

Panjim Municipal Corporation
BITS Pilani Goa Campus: गोव्यातील बिट्स पिलानी कॅम्पस सर्व विद्यार्थ्यांसाठी होणार खुला, ज्ञानाचा खजिना अनुभवता येणार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com