Gas LPG Crisis Dainik Gomantak
गोवा

LPG Gas Cylinder: सिलिंडरटंचाईचा मोठा फटका! कदंब स्थानकावरील कॅन्टीन बंद, वादावादीचे प्रकार वाढले; काही ठिकाणी चुलीला प्राधान्य

Gas cylinder shortage goa: सर्वजण बसस्थानकावरील कॅन्टीनमध्ये न्याहारी व भोजनाला प्राधान्य देतात. मात्र, कदंबा बसस्थानकातील दोन्ही कॅन्टीन सध्या बंद आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Gas Cylinder Crisis Goa : इंधनाच्या तुटवड्यामुळे पणजीतील लहान हॉटेल्स आणि कॅन्टीन सोमवारीपासून बंद ठेवावी लागत आहेत. शहरात कामानिमित्त येणारे नागरिक, प्रवासी आणि पर्यटक यांचा मोठा ओघ असतो. हे सर्वजण बसस्थानकावरील कॅन्टीनमध्ये न्याहारी व भोजनाला प्राधान्य देतात. मात्र, कदंबा बसस्थानकातील दोन्ही कॅन्टीन सध्या बंद आहेत.

मडगाव मार्गावर असलेल्या एका कॅन्टीनवर ‘सिलिंडरअभावी बंद’ असा फलकही लावण्यात आला आहे. इंधन तुटवड्यामुळे व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळणे कठीण झाले आहे. मोठ्या हॉटेल्सनी पर्याय म्हणून इंडक्शनचा वापर सुरू ठेवत व्यवसाय चालू ठेवला असला, तरी लहान हॉटेल व्यावसायिकांना मात्र या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे.

इतर दुकानांवर परिणाम होण्याची शक्यता

बसस्थानकावरील कॅन्टीन बंद असली तरी लहान गाळे व शीतपेय दुकाने सुरू आहेत. या दुकानांमध्ये विकले जाणारे खाद्यपदार्थ बाहेरून आणले जात असल्याने सध्या त्यांना अडचण भासत नाही. मात्र, पुढील दोन-तीन दिवसांत परिस्थिती कायम राहिल्यास त्यांनाही इंधन तुटवड्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

कामगारांवरही संकट

लहान कॅन्टीन आणि हॉटेल्समध्ये काम करणाऱ्या कामगारांवरही या परिस्थितीचा परिणाम झाला आहे. गाव जवळ असलेले काही कामगार घरी परतले असले, तरी अनेकांना कामाविना दिवस काढणे कठीण झाले आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास पुढे काय करायचे, या चिंतेने हातमजुरीवर अवलंबून असलेले कामगार त्रस्त झाले आहेत.

शहरात चूल पेटवणार कशी?

ग्रामीण भागात काही प्रमाणात चूल पेटवून व्यवसाय सुरू ठेवता येतो; मात्र शहरातील प्रमुख ठिकाणे आणि बसस्थानक परिसरात हा पर्याय शक्य नाही. इंडक्शनचा वापर करण्याचा पर्याय असला तरी तो अनेक लहान व्यावसायिकांना परवडणारा नाही. त्यामुळे नुकसान पत्करून कॅन्टीन बंद ठेवणे हा पर्याय त्यांच्यासमोर उरला आहे.

कुंकळ्ळीत सिलिंडर वाहनावर हल्ला

इराण व अमेरिका युद्ध आणखी पेटणार, या भीतीमुळे घाबरलेले लोक गॅस सिलिंडरासाठी गर्दी करताना दिसत आहेत. सोमवारी रात्री कुंकळ्ळीत मल्टी ट्रेडर्स या गॅस एजन्सीच्या वाहनावर दोघांनी हल्ला करून चालकाला व एका कामगाराला मारहाण केल्याची तक्रार एजन्सीचे मालक अमेय घोडेकर यांनी केली आहे.

पोलिसांनी आपल्या गॅस वाहनांना सुरक्षा प्रदान करावी व हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी अन्यथा आपण गॅस पुरवठा बंद करणार, असा इशारा घोडेकर यांनी दिला आहे. ही घटना गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात पुढील तपास करीत आहेत.

नागरी पुरवठा विभागाकडून वास्कोत गस्त

ग्राहकांना एलपीजी गॅस सिलिंडर वेळेवर वितरित करण्यासाठी नागरी पुरवठा खात्याच्या मुरगाव विभागाने काही खबरदारीचे उपाययोजना आखल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना घरपोच गॅस सिलिंडर मिळण्यास मदत होत आहे.

तसेच वितरकांच्या दुकानासमोरील गर्दी कमी होत आहे. गॅस सिलिंडरचा पुरवठा योग्यरित्या व्हावा यासाठी आम्ही जातीने पाहणी करीत असल्याचे मुरगाव विभागाचे साहाय्यक संचालक तुळशीदास दाभोलकर यांनी सांगितले.

म्हापशातील काही हॉटेलात चुलीवर शिजू लागले अन्न !

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे म्हापसा शहरातील तसेच इतर परिसरातील काही हॉटेलचालक पुन्हा एकदा पारंपरिक पद्धतीकडे वळताना दिसत आहेत. लहान-मोठ्या हॉटेलमध्ये आता चुली पेटू लागल्या आहेत. केवळ गरज म्हणून सुरू झालेली ही चूल आता ग्राहकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत असून ‘चुलीवरचे जेवण’ पुन्हा नव्याने उदयास येत आहे.

हॉटेल व्यावसायिकांच्या मते, चुलीवर शिजलेल्या अन्नाची चव गॅसवरच्या जेवणाला कधीच येऊ शकत नाही. या संदर्भात स्थानिक हॉटेल व्यावसायिक मोहन सावंत म्हणाले, आम्ही केवळ अडचण आली म्हणून नाही, तर आमच्या संस्कृतीचा एक भाग म्हणून चुलीला पुन्हा मानाचे स्थान दिले आहे. सध्या आम्ही नारळाच्या शेंड्या आणि लाकडाचा वापर करून चुलीवर जेवण बनवत आहोत. आम्ही खास चूल मांडली असून त्यावर आता विविध भाज्या, हुमण (कडी), उकडा भात आणि तळलेले मासे बनवले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: न्यूझीलंडमध्ये 'आफ्रिकी' पॉवर! वियान मुल्डरचा 'तो' शॉट पाहून तुम्हीही व्हाल अवाक; स्टेडियमची सीमा ओलांडून चेंडूनं गाठला रस्ता

Prabhakar Panshikar: ..खऱ्या अर्थानं नायक कसा असावा? याचे उत्तम उदाहरण 'प्रभाकर पणशीकर'

Querim Ponda: सफर गोव्याची! लावण्यमयी निसर्गराजीने नटलेलं, सुरश्री केसरबाई केरकरांचा पदस्पर्श लाभलेलं 'फोंडा-केरी'

Ponda By Election: फोंड्यात भाजपला 'गटबाजी'ची भीती! उमेदवारीचा पेच सुटेना; युती असूनही मगोचे काही कार्यकर्ते काँग्रेससोबत

Goa Opinion: ‘माझ्या गोव्याच्या भूमीत’ ऐकताना, हळूहळू नाहीसा होत चाललेला गोवा कानांना खुपत होता; राजकीय भक्ती आणि भवितव्य

SCROLL FOR NEXT