Ganesh Idol Sellers Registration Dainik Gomantak
गोवा

Ganesh Idol Sellers Registration: गणेशमूर्ती विक्रेत्यांना नोंदणीसाठी मुदतवाढ, पर्यावरण विभागाकडून संकेतस्थळ सुरू ठेवण्याचे निर्देश

Goa Ganesh Festival Rules: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती विक्रेत्यांच्या नोंदणीचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती विक्रेत्यांच्या नोंदणीचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पर्यावरण व हवामान बदल विभागाचे संचालक सचिन देसाई यांनी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र पाठवून विक्रेत्यांच्या नोंदणीसाठी आवश्यक निर्देश तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.

हे निर्देश लवकरच जारी होण्याची अपेक्षा असून, तोपर्यंत विक्रेत्यांना नोंदणी करता यावी यासाठी नोंदणी संकेतस्थळ सुरू ठेवण्याची सूचना मंडळाला करण्यात आली आहे.

नोंदणीची तारीख संपून जाऊनही अनेकांनी नोंदणी केलेली नाही. त्यांनी प्रयत्न करूनही नोंदणी करता येत नव्हती, असे वृत्त गोमन्तकने दिले होते. त्याची दखल घेत या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गणेशमूर्ती विक्रेत्यांच्या नोंदणीसंदर्भात गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने ३० जुलै रोजी पर्यावरण विभागाला पत्र पाठवण्यात आले होते. त्याला उत्तर देताना पर्यावरण विभागाने १० ऑगस्ट रोजी भूमिका स्पष्ट केली.

प्रक्रिया सुलभ करण्याची गरज

गणेशमूर्ती तयार करणे, त्यांची विक्री आणि पर्यावरणपूरक विसर्जन याबाबत शासनाकडून घालण्यात येणाऱ्या अटींच्या पार्श्वभूमीवर ही नोंदणी महत्त्वाची मानली जात आहे. आगामी गणेशोत्सवाच्या तयारीला वेग येत असताना पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करताना विक्रेत्यांना अनावश्यक अडचणी येऊ नयेत, यासाठी नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याची गरजही व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Badminton: गोव्याचा 16 वर्षीय आरुष पावसकरची जागतिक ज्युनियर मानांकनात झेप; 28 स्थानांची प्रगती, कारकिर्दीतील सर्वोत्तम 89वा क्रमांक

Goa Coconut Prices: गणेशचतुर्थीच्या आधी नारळाच्या दरवाढीला लगाम; फलोत्पादन महामंडळ ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर करणार विक्री

Goa Assembly Session: 27 विरुद्ध 7! 'गोवा नोंदणी सुधारणा विधेयक' विधानसभेत बहुमताने मंजूर; सरकारनं विरोधकांची मागणी फेटाळली

Goa Shack Policy: शॅक धोरणाला मुदतवाढ देण्याची याचिका हायकोर्टानं फेटाळली, सरकारचा फायनल निर्णय नाही

Mangal Gochar 2026: व्यवसाय, नोकरी अन् बँक बॅलन्स..! मंगळाचे नक्षत्रांतर 'या' राशींसाठी ठरणार वरदान; होणार अफाट धनलाभ

SCROLL FOR NEXT