Goa Coconut Prices: गणेशचतुर्थीच्या आधी नारळाच्या दरवाढीला लगाम; फलोत्पादन महामंडळ ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर करणार विक्री

Goa Horticulture Corporation: गणेशचतुर्थीच्या काळात नारळाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा फलोत्पादन महामंडळाने नागरिकांना रास्त दरात नारळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
Goa Horticulture Corporation
Goa Coconut PricesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गणेशचतुर्थीच्या काळात नारळाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा फलोत्पादन महामंडळाने नागरिकांना रास्त दरात नारळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर नारळविक्री करण्यात येणार असून, सणाच्या काळात नारळाचा तुटवडा भासू नये आणि वाढलेल्या बाजारभावाचा अतिरिक्त आर्थिक भार ग्राहकांवर पडू नये, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार प्रेमेंद्र शेट यांनी विधानसभेच्या आवारात माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. गणेश चतुर्थीच्या काळात धार्मिक विधी, पूजाविधी आणि अन्य सणासंबंधी तयारीसाठी नारळाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. त्यामुळे या काळात मागणी वाढून दर आणखी वाढण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन महामंडळाने यंदाही नारळविक्री करण्याचा निर्णय घेतल्याचे शेट यांनी सांगितले.

Goa Horticulture Corporation
Goa Assembly Session: 27 विरुद्ध 7! 'गोवा नोंदणी सुधारणा विधेयक' विधानसभेत बहुमताने मंजूर; सरकारनं विरोधकांची मागणी फेटाळली

बाजारात नारळाच्या दरात सध्या वाढ झाल्याने चतुर्थीच्या काळात ग्राहकांना त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत महामंडळाच्या माध्यमातून वाजवी दरात नारळ उपलब्ध झाल्यास सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. राज्यातील नागरिकांना सणासुदीच्या काळात आवश्यक प्रमाणात नारळ उपलब्ध व्हावा, यासाठी महामंडळाकडून नियोजन करण्यात येत आहे.

नंतरच करणार विक्रीचा दर निश्चित

गेल्या वर्षी राज्यात नारळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे चतुर्थीच्या काळात संभाव्य तुटवडा लक्षात घेऊन फलोत्पादन महामंडळाने प्रथमच रास्त दरात नारळ उपलब्ध करून दिले होते. गेल्या वर्षी महामंडळाकडून सुमारे दोन लाख नारळांची विक्री करण्यात आली होती. त्यावेळी प्रतिनारळ ४० रुपये दर आकारण्यात आला होता.

Goa Horticulture Corporation
Goa Shack Policy: शॅक धोरणाला मुदतवाढ देण्याची याचिका हायकोर्टानं फेटाळली, सरकारचा फायनल निर्णय नाही

यंदाही चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर नारळविक्री केली जाणार आहे. चतुर्थीपूर्वी सुमारे आठ दिवस महामंडळाच्या गाळ्यांवर नारळ विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. यंदा नारळ ज्या दराने खरेदी केले जातील, त्यानुसार विक्रीचा दर निश्चित केला जाणार असल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रहास देसाई यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com