Mangal Gochar 2026: व्यवसाय, नोकरी अन् बँक बॅलन्स..! मंगळाचे नक्षत्रांतर 'या' राशींसाठी ठरणार वरदान; होणार अफाट धनलाभ

Mangal Nakshatra Parivartan Benefits 2026: ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह आज (2 सप्टेंबर) रोजी दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी आर्द्रा नक्षत्रातून बाहेर पडून पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश केला.
Mangal Nakshatra Parivartan Benefits 2026
Mangal GocharDainik Gomantak
Published on
Updated on

Mangal Nakshatra Parivartan Benefits 2026: ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह आज (2 सप्टेंबर) रोजी दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी आर्द्रा नक्षत्रातून बाहेर पडून पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश केला. पुनर्वसु हे नक्षत्र देवगुरु बृहस्पतीचे (गुरु) मानले जाते. मंगळ ग्रह येत्या 24 सप्टेंबरपर्यंत या नक्षत्रात विराजमान राहणार असून, मंगळाच्या या नक्षत्र बदलामुळे मेष ते मीन अशा सर्व 12 राशींवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रभाव पडणार आहे.

मात्र, ज्योतिषीय गणनेनुसार या नक्षत्र परिवर्तनाचा सर्वात मोठा आणि सकारात्मक फायदा वृषभ, मिथुन, सिंह, तुळ आणि धनु या 5 राशींच्या जातकांना होणार आहे. या राशींच्या लोकांचे नशीब उजळणार असून, त्यांना आर्थिक व व्यावसायिक क्षेत्रात मोठे यश मिळण्याची दाट शक्यता आहे.

Mangal Nakshatra Parivartan Benefits 2026
Horoscope 2 September 2026: नोकरीत पगारवाढ अन् पदोन्नतीचा योग! घरात नांदणार सुख-शांती; बुधवारी 'या' राशींची लागणार लॉटरी

वृषभ राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे नक्षत्र परिवर्तन प्रगतीचे नवे दालन उघडणारे ठरेल. नोकरी आणि करिअरमध्ये (Career) यश मिळण्यासोबतच आर्थिक बचतीचे प्रयत्न यशस्वी होतील. घरातील वातावरण आनंदी आणि शांतीपूर्ण राहील. मिथुन राशीच्या लोकांच्या आत्मविश्वासात आणि धाडसात प्रचंड वाढ होईल. व्यवसायात प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतील आणि करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील.

Mangal Nakshatra Parivartan Benefits 2026
Horoscope: सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी 'या' 5 राशींचे चमकणार नशीब! नोकरीत यश, व्यापारात भरभराट अन् धनलाभाचे योग

सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरणार आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढल्याने बँक बॅलन्स भक्कम होईल. नोकरीत पदोन्नतीची बातमी मिळू शकते, तर व्यापाऱ्यांना नवीन आणि फायदेशीर डील्स मिळण्याची दाट शक्यता आहे.

Mangal Nakshatra Parivartan Benefits 2026
Horoscope: श्रावण पौर्णिमा ठरणार खास! 'या' राशींना मिळणार धन-ऐश्वर्याचा लाभ, करिअरमध्ये प्रगती अन् अनेक दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण होतील

तुळ राशीच्या लोकांसाठी व्यवसायात मोठा धनलाभ होण्याचे संकेत आहेत. या काळात प्रवासाचे शुभ योग जुळून येतील. विद्यार्थ्यांसाठी हा वेळ अत्यंत अभ्यासासाठी अनुकूल राहील आणि त्यांना नशिबाची पूर्ण साथ लाभेल. धनु राशीच्या जातकांच्या आयुष्यात मंगळाचे हे गोचर सुख आणि समृद्धी घेऊन येईल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल, ज्यामुळे समाजात आणि कार्यक्षेत्रात मान-सन्मान वाढेल. एकंदरीत, 24 सप्टेंबरपर्यंतचा काळ या 5 राशींच्या जातकांसाठी अत्यंत सुवर्णमय आणि प्रगतीकारक ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com