Goa Badminton: गोव्याचा 16 वर्षीय आरुष पावसकरची जागतिक ज्युनियर मानांकनात झेप; 28 स्थानांची प्रगती, कारकिर्दीतील सर्वोत्तम 89वा क्रमांक

Aarush Pawaskar World Junior Ranking: गोव्याचा युवा बॅडमिंटनपटू आरुष पावसकर याने जागतिक ज्युनियर मुलांच्या एकेरी मानांकन अफलातून भरारी घेतली.
Aarush Pawaskar World Junior Ranking
Goa badminton player Aarush Pawaskar celebrates career-best junior world rankingDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याचा युवा बॅडमिंटनपटू आरुष पावसकर याने जागतिक ज्युनियर मुलांच्या एकेरी मानांकन अफलातून भरारी घेतली. अवघ्या १६ वर्षांच्या या खेळाडूने जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्ल्यूएफ) १९ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत २८ क्रमांकांची प्रगती साधताना ८९ स्थानी झेप घेतली आहे.

१९ वर्षांखालील मुलांच्या एकेरीतील जागतिक मानांकनात आरुषचे ३७९० गुण झाले आहेत. युरोप दौऱ्यात आरुषने लक्षणीय प्रगती साधली. व्हिक्टर बल्गेरियन ज्युनियर ओपन स्पर्धेत तो ब्राँझपदकाचा मानकरी ठरला. या स्पर्धेत पाचपैकी चार सामने जिंकताना आरुषने बल्गेरियाचा जागतिक मानांकनात २१व्या क्रमांकावर असलेला तिओदोर मितेव याला पराभूत केले होते.

Aarush Pawaskar World Junior Ranking
Goa Coconut Prices: गणेशचतुर्थीच्या आधी नारळाच्या दरवाढीला लगाम; फलोत्पादन महामंडळ ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर करणार विक्री

आरुषने गतवर्षी फ्रान्समधील १७ वर्षांखालील खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या एकेरीत रौप्यपदक पटकावले होते. आरुष सध्या बंगळूर येथील सिंपली स्पोर्ट्‌स बॅडमिंटन अकादमीत प्रशिक्षण घेत असून तेथे त्याला भारताचे ऑलिंपियन आणि माजी राष्ट्रीय विजेते बॅडमिंटनपटू अरविंद भट यांचे मार्गदर्शन लाभले. प्रारंभिक टप्प्यात त्याला भारताचे माजी खेळाडू उत्सव मिश्रा यांनी मार्गदर्शन केले.

जागतिक ज्युनियर मानांकनात भन्नाट प्रगती साधलेल्या आरुष याचे गोवा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी अभिनंदन केले आहे. पाटील यांनी सांगितले, की वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी आरुषची ही प्रचंड मोठी कामगिरी आणि गोव्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. त्याला गोवा कार्बन लिमिटेड आणि सोलास मरिन यांचेही पाठबळ लाभते.

Aarush Pawaskar World Junior Ranking
Goa Assembly Session: 27 विरुद्ध 7! 'गोवा नोंदणी सुधारणा विधेयक' विधानसभेत बहुमताने मंजूर; सरकारनं विरोधकांची मागणी फेटाळली

टॉप ५० मध्ये येण्याचे लक्ष्य

जागतिक ज्युनियर बॅडमिंटन मानांकनात १९ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत ८९वा क्रमांक हे आरुष पावसकरचे कारकिर्दीतील सर्वोत्तम मानांकन आहे. कामगिरीतील सातत्य कायम राखत त्याने आता जागतिक क्रमवारीत पहिल्या पन्नास खेळाडूंत स्थान मिळविण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य बाळगले आहे. त्यासाठी कठोर मेहनत घेण्याचा निर्धार केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com