Goa Ganesh Festival  संग्रहित
गोवा

Goa Ganesh Festival : गणेश मंडळांच्या व्यवहारांचे ऑडिट होणे आवश्यक

सार्वजनिक म्हटले जाते; पण खर्चाचा तपशील मर्यादितच!

दैनिक गोमन्तक

Goa Ganesh Festival : राजधानी पणजीत सध्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्‍याइतकी आहे. परंतु, या मंडळांकडे दरवर्षी गणेशोत्सवात लाखो रुपये देणगी स्‍वरूपात जमा होतात. अधिकृतरित्या नोंदणी असेल तर त्या मंडळाची चार्टर्ड अकाऊंटंटकडून जमा-खर्चाची तपासणी (ऑडिट) होणे अपेक्षित असते. त्याशिवाय तो अहवाल लोकांसाठी सार्वजनिक करणेही गरजेचे आहे.

मात्र, खरोखरच तसे घडते का, याबाबत प्रश्‍‍नचिन्‍ह आहे. म्‍हणूनच देणगी स्‍वरूपात जमा होणाऱ्या निधीचा विनियोग कशाप्रकारे होतो, हे जाणून घेणे किंवा त्यांना जाहीरपणे माहीत करून देण्याची जबाबदारी मंडळांची नाही काय? असा सवाल उपस्थित होतो. पणजीत मध्यवर्ती ठिकाणी बाजारकरांचा गणेशोत्सव असतो.

त्याशिवाय पणजी शहर पोलिस स्थानक, आल्तिनो येथे राखीव पोलिस दल आणि मळ्यात मारुती गडावर देवस्थानचा गणेशोत्सव साजरा होतो. त्याशिवाय पणजी-मळा भागातील युवा पणजी ही संघटना गणेशोत्सव काळात देखावा तयार करण्याचे काम करते.

पणजी परिसरातील सार्वजनिक गणेशोत्‍सव

बाजारकर मंडळ : चार लाख रुपयांची देणगी

पणजीतील बाजारकर गणेशोत्‍सव मंडळाचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी म्हणाले, मंडळाला साधारण चार ते साडेचार लाखांची देणगी प्राप्‍त होते. सर्व बाबींसाठी साधारण खर्च होऊन 25 हजारांपर्यंत रक्कम शिल्लक राहते. खजिनदारामार्फत सर्व खर्च लिहून ठेवला जातो. खर्चाचा अहवाल मंडळात लावला जातो.

पणजी पोलिस : सर्व जमा-खर्चाची नोंद

पणजी पोलिस स्थानकातील गणेशोत्सवात पोलिसांकडून आणि स्‍वेच्‍छेने भाविकांकडून देणग्‍या स्‍वीकारल्‍या जातात. गणेशोत्सवात होणाऱ्या खर्चाची सर्व नोंद ठेवली जाते. शिल्लक रकमेचा विनियोग कार्यालयीन कामासाठी केला जातो. गणेशोत्सवासाठी आलेल्‍या खर्चाचा अहवाल फलकावर लावला जातो.

मळ्यातील देखावा : जमा-खर्चाचे ऑडिट

पणजी -मळा येथील मंडळ झरीच्या ठिकाणी देखावा उभारते. यासाठी लोकांकडून निधी गोळा केला जातो. वर्षभर विविध उपक्रम केले जा‍तात. मंडळाच्या खर्चाचे ऑडिट केले जाते. परंतु तो अहवाल सार्वजनिकरित्‍या खुला केला जात नाही, असे मंडळाचे अध्यक्ष रघुवीर महाले यांनी सांगितले.

कदंब स्‍थानक : दोन ते अडीच लाख देणगी

कदंब बसस्थानकावरील गणेशोत्सवात कर्मचाऱ्यांसह प्रवाशांकडून स्‍वेच्‍छेने वर्गणी घेतली जाते. उत्सवावेळी फंडपेटीतील आणि शिल्लक रकमेची नोंद ठेवून जमा-खर्चाचे ऑडिट होते. सर्व जमा-खर्च सर्वांसाठी खुला केला जातो, असे साहाय्यक आगार व्यवस्थापक भिकाजी फडते यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Made Liquor Seized: गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; सिंधुदुर्गातील इन्सुली चेकपोस्टवर 6.80 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Goa Spa Scam: गोव्यात 'स्पा'च्या नावाखाली फसवणूक? पर्यटकाने सांगितला धक्कादायक अनुभव; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल!

Gautam Gambhir Fight: तू येथून निघ... पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी गौतम गंभीरचं इंग्लंडमध्ये झालं भांडण! पाहा VIDEO

रेस्टॉरंटमध्ये अचानक घुसला 'छोटा' पाहुणा, कर्मचाऱ्याने प्रेमाने दिला नाश्ता; हृदयस्पर्शी Video Viral

Goa Assembly Session: गोव्यात पर्यटक घटले! सरकारने आत्मचिंतन करावे- विरोधी पक्षनेते युरी आलेमाव

SCROLL FOR NEXT