ganesh festival Dainik gomantak
गोवा

Goa Ganesh Featival: डिचोली बाजारपेठ फुलली

पावसाने दडी मारल्याने रानटी फळांचा पुरवठा रोडावला

Sumit Tambekar

अवघ्या दोन दिवसांवर गणरायाचे आगमण आले असल्याने गोव्यातील अनेक बाजारपेठा फुलल्या आहेत. कोरोना सावटातून बाहेर पडल्यामूळे नागरिक ही यंदा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी तयारीला लागले आहेत. यासाठी आवश्यक असणाऱ्या खरेदीकडे ग्राहक वळू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर डिचोली बाजारपेठ फुलली आहे.

( Goa Ganesh Featival Bicholim market flourished for Ganesh Chaturthi)

दोन वर्षे सर्व सणांवर मर्यादा होत्या सध्या कोरोना संकट संपुर्णरित्या टळले नसले तरी बहूतांशी कमी झाले आहे. यामूळे यंदा गणेशोत्सवात खरेदीला ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे. याबाबत डिचोली बाजारपेठेत विक्रेत्यांनी गोमंतकशी बोलताना सांगितले की, यंदा पावसाने काहीशी दडी मारली आहे. यामूळे बहुतांश रान फळे यंदा बाजारपेठांमध्ये कमी आहेत. असे असले तरी आवश्यक ती फळे - फुले पुरेशा प्रमाणात बाजारपेठेत उपलब्ध झाली आहेत.

तसेच जी फळे पावसाअभावी पुरेशाप्रमाणात बाजारपेठांमध्ये उपलब्ध होऊ शकलेली नाहीत यांच्या किंमती ही काहीशा वाढल्या आहेत. तसेच माटोळी लागणारी कांगल्यो, माट्टूला, सुपारीची शिंपडी हे साहित्य पुरेशा प्रमाणात बाजारात पोहोचले आहे. असे विक्रेत्यांनी गोमंतकशी बोलताना सांगितले.

तसेच ग्राहकांचा यंदा मिळत असलेला चांगला प्रतिसाद पाहता काही प्रमाणात फळ - फुल विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तसेच गणेशभक्तामध्ये ही वस्तूंची खरेदी उत्साहात होत असल्याचे चित्र आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 'ही' मागणी मंजूर झाल्यास पगारात 51 हजार रुपयांची वाढ होणार

Viral Video: फुटबॉल सामन्यात अचानक गाईची एन्ट्री; मैदानावर दाखवली भन्नाट ड्रिब्लिंगची कला! व्हिडिओ व्हायरल

FIFA World Cup 2026: मेक्सिकोची बाद फेरी निश्चित, गोलरक्षक किम सेऊंगची चूक दक्षिण कोरियाच्या मुळावर

खरी कुजबुज: शिवसेनेची शर्यत!

Goa Tourism: देशांतर्गत पर्यटकांचा ओघ कायम, मे महिन्यात 4.53% वाढ; 46.39 लाख पर्यटकांची नोंद

SCROLL FOR NEXT