Goa Ganesh Featival: सण, उत्सवांच्या माध्यमातून सर्वांनी आपापसातील मतभेद मिटवून एकत्र येण्याची गरज आहे. गावातील एकजूट अशा प्रकारच्या कार्यक्रमांतून लोकांनी दाखविली पाहिजे, असे प्रतिपादन वाळपईचे आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले. गुळेली-सत्तरी येथे नव्याने बांधलेल्या गणेश विसर्जनस्थळाचे काल शुक्रवारी लोकार्पण सोहळा केल्यानंतर राणे बोलत होते.
यावेळी गुळेली सरपंच नितेश गावडे, उपसरपंच रत्नाकर कासकर, समाजसेवक विनोद शिंदे, पंच अक्षिता गावडे, प्रशांती मेळेकर, ज्योती गावकर, अनिल गावडे, गुळेलीतील सावंत बंधू, यशवंत सावंत, विश्वराज सावंत, विजयसिंग सावंत, विनोद गावकर, अस्मिता मेळेकर, अपूर्वा च्यारी, विठ्ठल कासकर, कंत्राटदार सुखानंद बर्वे, उसगाव-गांजे सरपंच नरेंद्र गावकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रेमनाथ हजारे व अन्य मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रेमानंद नाईक यांनी केले तर पंच अक्षिता गावडे यांनी आभार मानले. या लोकार्पण सोहळ्याला गुळेली पंचायत क्षेत्रातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* सावंत बंधूंनी दिली आपली जमीन
सत्तरीच्या विकासासाठी प्रयत्नरत असलेले मंत्री विश्वजीत राणे यांच्यासोबत राहून त्यांचे हात आम्ही बळकट करुया, असे आवाहन नितेश गावडे यांनी केले. गुळेलीचे माजी पंच अनिल गावडे यांच्या प्रयत्नातून साकार झालेल्या गणेश विसर्जनस्थळाबाबत बोलताना ते म्हणाले की, हा प्रश्न गुळेलीतील सावंत बंधूंनी उपलब्ध करून दिलेल्या जमिनीमुळे सुटला. यासाठी सर्वांच्या आभार मानतो.
* विश्वजीत राणे, आरोग्यमंत्री-
युवकांसाठी सत्तरीतील प्रत्येक पंचायतक्षेत्रात क्रीडांगण उभारण्यासाठी आपण प्रयत्नरत आहे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. पुढील पाच वर्षांत सरकार अनेक नवनवीन प्रकल्प उभारणार असून, बेरोजगारी कमी होईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.