Goa Ganesh Chaturthi 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Ganesh Chaturthi 2023: कधी थांबणार ही विटंबना? समुद्र किनारपट्टीवर आढळलं विसर्जनाचं विदारक दृश्य

पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी बंदी असूनही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचे संकेत काही दिवसांपूर्वी दिले होते.

Ganeshprasad Gogate

Goa Ganesh Chaturthi 2023 गोमंतकीयांच्या आवडीची आणि उत्साहाची 'चवथ' सध्या सुरु आहे. चवथीचा उत्सव 'मखरात गणपतीच्या मूर्तीची स्थापना' करून सुरू होतो आणि गावातल्या नदीत, तळ्यात, विहिरीत किंवा ओढ्यात त्या 'मूर्तीचे विसर्जन' केल्यानंतर संपतो.

गोव्यात दीड दिवसांच्या गणपतींचं विसर्जन झालं. मात्र काही तासांच्या आत विसर्जनाचं विदारक दृश्य गोव्यातील समुद्र किनारपट्टीवर दिसून आलंय.

गोव्यातील कोलवा समुद्र किनाऱ्यावर विसर्जित केलेल्या POP च्या गणेशमूर्तीचे भग्नावशेष वाहून आले आहेत. किनारपट्टीवर हे विदारक दृश्य सध्या पाहायला मिळलं.

विशेष म्हणजे गोवा सरकारच्या हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष तथा पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी बंदी असूनही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचे संकेत काही दिवसांपूर्वी दिले होते.

मात्र असं असताना राज्यात अजूनही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे पूजन केले जात असल्याचे सत्य या घटनांमधून उघड झालंय.

आपण जे दैवत पूजतो, त्याची विसर्जनानंतर होणारी विटंबना रोखण्यासाठीच गोव्यात सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी आणली. या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने विसर्जनानंतर त्या बरेच महिने भग्नावस्थेत राहतात.

त्यामुळे साहजिकच लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. या गोष्टीची सरकारी पातळीवर दखल घेऊन सरकारने चिकणमातीच्या गणेशमूर्ती तयार करण्यासाठी राज्यातील मूर्तिकारांना महामंडळातर्फे यंत्रे देऊ केली होती. मात्र असं असूनही राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पुजल्या जात असून आज शुक्रवारी किनाऱ्यावर विसर्जनानंतरच विदारक चित्र पाहायला मिळालं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT