Porvorim Accident: बस- इनोव्हा कार यांच्यात अपघात, गिरी पर्वरी मार्गावर वाहतूक कोंडी

व्यावसायिकांचे बेशिस्त पार्किंग हे या वाहतूक कोंडीला तसेच अपघाताला कारण ठरत आहे.
Porvorim Accident
Porvorim AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Porvorim Traffic Jam शुक्रवारी दुपारी तीन ते सव्वातीन च्या दरम्यान म्हापसा पणजी महामार्गावरील पर्वरी येथे खाजगी बस आणि इनोव्हा कार यांच्यात अपघात झाला असून यात बस मधील प्रवासी जखमी झाल्याची माहिती प्राप्त झालीय.

ही बस पणजीहून वाळपई येथे जात होती तर कारचालक म्हापसा येथून पणजी येथे जात असताना हा अपघात झाल्याचे प्राथमिक वृत्त समजले आहे

या अपघातामुळे गिरी पर्वरी महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून वाहनचालकांना तब्बल अर्धा तास खोळंबून राहावे लागले.

सध्या राज्यात गणेश चतुर्थीची धामधूम सुरु असून गोवेकरांना पुन्हा एकदा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले आहे. पर्वरी- गिरी रस्त्यावर दोन्ही लेन मधून वाहनांच्या रांगा लागल्या असून वाहतूक संथ गतीने पुढे सरकत होती. या वाहतूक कोंडीचा फटका नागरीकांसह चाकरमान्यांना बसला.

पर्वरी संजय स्कूल ते गिरी पर्यंत दररोज वाहतूक कोंडी होत असून अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. संजय स्कूलकडून वडाकडे पर्यंत हा रस्ता एक मार्गी असला तरीही येणारे मोठे ट्रक, टँकर, व वाहन चालक यांचे बेदरकारपणे चालवणे व या भागातील व्यावसायिकांचे बेशिस्त पार्किंग हे या वाहतूक कोंडीला तसेच अपघाताला कारण ठरत आहे.

विशेष म्हणजे या रस्त्यावर पोलिस यंत्रणा वाढवण्यासाठी, स्थानिक आमदार व पर्यटन मंत्री रोहन खवटे यांनी प्रयत्न करून, वाहतूक पोलिस शाखा पर्वरीत सुरू केली होती. ही शाखा सुरुवातीस सर्व ठिकाणी व्यवस्थित पोलिस नेमून वाहतूक सुरळीत करण्यात यशस्वी झाली होती. पण सध्या वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे ही यंत्रणा अपुरी ठरत असल्याचे दिसून येतंय.

Porvorim Accident
Kunbi Gram Project :कुणबी ग्राम प्रकल्पासाठी गोवा सरकार DCPL ला देणार ४३ लाखांचे मानधन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com