Market  Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi: करंज्‍या, माेदक बनविण्‍याची तयारी अंतिम टप्‍प्‍यात; खरेदीसुद्धा जोमात

यंदा माटोळीच्या सामानाचे दर चढेच असल्याचे आढळून आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Ganesh Chaturthi:

गणेश चतुर्थीसाठी खरेदी तसेच फराळ बनविण्‍याची लगबग सुरू झाली आहे. करंज्‍या, मोदक घरोघरी बनविले जात आहेत. गणपतीच्या चित्रशाळा गजबजून गेल्या आहेत. गोवा आणि कोकणातील हा सर्वांत मोठा सण असल्याने चाकरमानी गावाकडे परतू लागले आहेत.

यंदा माटोळीच्या सामानाचे दर चढेच असल्याचे आढळून आले. पणजी फेरीबोट धक्का ते कांपाल आरोग्य खात्यापर्यंत भरलेल्या अष्‍टमीच्‍या फेरीत फर्निचरपासून, कपडे, स्वयंपाकघरात लागणाऱ्या वस्तू, सजावटीचे साहित्‍य तसेच खाद्यपदार्थांसह नाना तऱ्हेचे स्टॉल्स आहेत.

या स्टॉल्‍सवर संध्याकाळपासून रात्री नऊ-साडेनऊ वाजेपर्यंत खरेदीसाठी गर्दी असते. त्यामुळे हा मार्ग गजबजलेला असतो. चित्रशाळांमध्‍ये गणपतीच्या कलात्मक आणि आकर्षक मूर्ती लक्ष वेधून घेत आहेत.

कमीत कमी ६०० ते जास्‍तीत जास्‍त २७ हजार रुपयांपर्यंत गणपतीच्या मूर्ती विक्रीला उपलब्‍ध आहेत. त्यात बालगणेशापासून मोर, गरुड, उंदीर, सिंहावर आरूढ झालेल्या मूर्ती, शंकर-पार्वतीसह गणेश, नारदरुपी गणेश तसेच अन्‍य मूर्तींचा समावेश आहे.

घुमटवाद्ये सर्वत्र विक्रीसाठी उपलब्‍ध

एकंदरीत गणेशभक्तांमध्‍ये चतुर्थीचा उत्साह आतापासूनच ओसंडून वाहत आहे. शनिवारी संध्याकाळी पावसाने हजेरी लावल्याने खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांची थोडी गैरसोय झाली. गणेश चतुर्थी आणि घुमट आरती हे समीकरण आता गोव्यात रूढ झाले आहे.

किंबहुना घुमट आरती हे इथल्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले आहे. घुमट आरती पथकांना या उत्सवात बरीच मागणी असते. उत्सव काळात घुमटांचा नाद गावोगावी घुमत असतो.अनेक मार्गांवर घुमटवाद्ये विक्रीसाठी ठेवलेली दिसून येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT