नगर विकास मंत्री मिलिंद नाईक आपल्या बाप्पाची मूर्ती, बायणा येथील चित्र शाळेतून नेताना (Goa Ganesh Chaturthi) Dainik Gomantak
गोवा

Goa Ganesh Chaturthi: गोव्यात घरोघरी बाप्पांचे आगमन

नगर विकास मंत्री मिलिंद नाईक यांनी समस्त गोवेकरांना चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या (Goa Ganesh Chaturthi)

Dainik Gomantak

Goa Ganesh Chaturthi: ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहात होतो त्या आपल्या लाडक्या गणपतीच्या आगमनाने (Ganpati's arrival) सर्वत्र वातावरण हर्षभरित झाले. गणरायाचे आज संध्याकाळी जल्लोषी स्वागत (Welcome to Ganpati) करण्यात आले. गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे (Corona Epidemic) विरजण पडलेल्या गणेश चतुर्थीला यंदा मात्र वेगळेच स्वरूप आलेले दिसले. गेल्यावर्षी बंदिस्त अवस्थेतच चतुर्थी साजरी करण्यास कोरोनाने भाग पाडले. तर यंदा कोरोना काळात कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, एकमेकाशी कसे रहावे, याची जाणीव झाल्यानेच लोक आपापल्यापरीने यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यास सज्ज झाले आहेत.

दोन महिन्यापूर्वी तर यंदा गणेश चतुर्थी साजरी करण्याविषयी दुविधावस्थेत लोक होते. मात्र श्रींच्या कृपेने सर्व काही सुरळीत झाल्याने लोकांनी आपापल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जल्लोषी तयारी केली आहे. दरम्यान आज संध्याकाळी माटोळी बांधल्यानंतर गोव्यात सर्वत्र गणरायांचे आगमन झालेले पहायला मिळाले. फटाक्यांचा आवाज कानावर पडत होता.

भाविकांनी चित्र शाळेत जाऊन गणेश मूर्तिकारांना त्यांचा श्रीफळाचा मान देऊन आपली गणेश मूर्ती घरी आणली. आपल्या लाडक्या गणरायाचे घरात झालेले आगमन पाहून बाळगोपाळांचा आनंद द्विगुणित झाला. मुले व घरातील मंडळी बाप्पाच्या आगमनाने हर्षभरित झाली. घरातील मंडळींनी बाप्पाची घरात घेण्यापूर्वी दारावर ओवाळणी करून घरात सजावट केलेल्या मखरात बसविले. घराला मंदिराचे स्वरूप प्राप्त झाल्याचे पाहायला मिळाले. घरातील सर्व मंडळी हर्षभरीत झाली.

दरम्यान नगर विकास मंत्री मिलिंद नाईक (Urban Development Minister Milind Naik) यांनीही आपल्या बाप्पाची मूर्ती बायणा येथील चित्र शाळेतून नेली. वर्ष पद्धतीप्रमाणे मंत्री नाईक आपल्या कुटुंबीयांसमवेत मूर्ती न्यायला आले होते. त्यांनी समस्त गोवेकरांना चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT