Goa: सार्वजनिक गणेशोत्सव किती दिवसांत अद्यापही गुलदस्त्यात

वास्कोत सार्वजनिक गणेशोत्सवाचा माहोल तयार
Public Ganeshotsav atmosphere created in Vasco
Public Ganeshotsav atmosphere created in VascoDainik Gomantak

दाबोळी: कोरोना (Covid-19) महामारीमुळे गेल्यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवावर (Goa Ganesh Chaturthi) विरजण पडले होते.मात्र काही मंडळांनी यंदाचा उत्सव वर्षपध्दतीनुसार अनंत चतुर्दशीपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानिमित्त काही ठिकाणी भजने, फुगडी तसेच सार्वजनिक सत्यनारायण महापुजा होईल. कोरोनामुळे देणगी कुपन योजना रद्द करण्यात आली आहे.

काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तयारी सुरु करुन आवश्यक साधनांची जमवाजमव चालू केली. यंदाही उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने नागरिकांत भीती आहे. मात्र भाविकांच्या उत्साहावर विरजण नको, यासाठी उत्सव समितीतर्फे गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे सांगितले. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. वास्को शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मंडप घालण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचा माहोल तयार झाला आहे. गेल्या वर्षी करोना महामारी मुळे असा माहोल नव्हता तसा यंदा पाहयला मिळाला.

Public Ganeshotsav atmosphere created in Vasco
Ganesh Chaturthi 2021: आई...देव बाप्‍पा आले!

दरम्यान नवेवाडे वास्को येथील वाडेनगर गणेशोत्सव मंडळातर्फे वर्ष पद्धतीप्रमाणे साजरा होणारा सार्वजनिक गणेशोत्सव शुक्रवार दिनांक 10 ते शनिवार दिनांक 18 सप्टेंबरपर्यंत असे नऊ दिवस साजरा करण्याचे योजिले आहे. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली असून शुक्रवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता श्री गणेश पूजन त्यानंतर महाआरती, तीर्थप्रसाद तसेच नऊ दिवस दररोज दुपारी साडेबारा व रात्री साडेआठ वाजता आरती व तीर्थप्रसाद कार्यक्रम होणार आहे. दरम्यान या काळात गुरुवार 16 सप्टेंबर पर्यंत फक्त आरतीचा कार्यक्रम होणार असून शुक्रवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता महिलांसाठी रांगोळी स्पर्धा तद्नंतर हळदीकुंकू होणार.

Public Ganeshotsav atmosphere created in Vasco
Ganesh Chaturthi 2021: ऊँ गं गणपतये नमः

शनिवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता श्री महारुद्र हनुमान युवा आरती मंडळ यांची घुमट आरती व शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती व विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण व तद्नंतर श्रींची मिरवणूक निघून वाडे तळे येथे विसर्जन करण्यात येणार आहे दरम्यान शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी साईनाथ (9823166858) जयकुमार (9765770773), राजेंद्र नाईक(9823730343) किंवा देवस्थान पुजाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर असून त्याआधी अर्ज संबंधितांकडून घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com