Goa G20 Summit 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa G20 Summit 2023: औषधनिर्मिती क्षेत्रात सहकार्य वाढवणार; डॉ. भारती पवार यांचे विधान

‘जी २०’ समूहातील देशांकडून मदतीचा प्रस्ताव

दैनिक गोमन्तक

Goa G20 Summit 2023: ‘जी-२०’ गटात आरोग्य क्षेत्रात संशोधन आणि औषध निर्मितीत सहकार्याचा मंच उभारण्यासाठी भारत आग्रही आहे.

यासाठी सदस्य राष्ट्रांनी पुढे यावे, असे आवाहन केंद्रीय कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

भारताच्या अध्यक्षतेखाली ‘जी-२०’ समूहाच्या आरोग्य विषयक कृती गटाची दुसरी बैठक सध्या पणजी येथे सुरू आहे.

बैठकीच्या पहिल्या दिवशी, सोमवारी भारताच्या जी-२० आरोग्य ट्रॅकसंदर्भातील तीन प्राधान्यक्रमांच्या अनेक पैलूंबाबत विविध विचारमंथन सत्रात केंद्रीय राज्यमंत्री पवार बोलत होत्या. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनीही मार्गदर्शन केले.

सत्रानंतर सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी मनोगत व्यक्त केले. या चर्चेदरम्यान विविध देशांनी सहकार्याचा प्रस्ताव ठेवला. महामारीच्या व्यवस्थापनात प्रयोगशाळांचे अत्याधुनिक जाळे, संबंधित पायाभूत सुविधांच्या प्रस्तावांवर देखील सदस्यांनी चर्चा केली.

त्यानंतर सुमारे तासभर चाललेल्या सत्रात केवळ जी २० सदस्य देशांमध्ये फलनिष्पत्ती संदर्भातील दस्तऐवजाच्या मसुद्यावर चर्चा करण्यात आली.  पुराव्यावर आधारित, सर्वसमावेशक, न्याय्य, समान, पारदर्शक आणि गरजेवर आधारित उपायांद्वारेच  सहमती व्हावी यावर भर देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa Today's Live News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही - मुख्यमंत्री स्पष्टच बोलले!

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

Maharashtra Election Holiday: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानासाठी गोवा सरकारची भरपगारी सुट्टी; आदेश जारी

SCROLL FOR NEXT