Goa G20 Summit Dainik Gomantak
गोवा

Goa G20 Summit : गोव्याला यजमानपद ; अक्षय ऊर्जा, शाश्वत विकासासाठी बैठक

19 जुलैपासून आयोजन : 1500 हून अधिक प्रतिनिधींचा सहभाग

गोमन्तक डिजिटल टीम

Goa G-20 Summate : जी२० ऊर्जा संक्रमण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीचे यजमानपद गोवा राज्य भूषवत असून या बैठकीसाठी 1500 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या बैठकीच्या माध्यमातून अक्षय ऊर्जा आणि शाश्वत विकासासाठीची वचनबद्धता जगासमोर मांडण्यात येणार आहे. ही बैठक १९ ते २० जुलैदरम्यान होणार आहे.

ऊर्जा आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी विचारमंथन होणाऱ्या या बैठकीत जी२० सदस्य देशांचे प्रतिनिधी, जागतिक ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाचे नेते, विशेष आमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रममधील निमंत्रित अशा १५००हून अधिक प्रतिनिधींचा सहभाग असेल.

ऊर्जा संक्रमण आणि शाश्वत विकास याबाबत जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी या ऊर्जा संक्रमण कार्यगटाची निर्मिती करण्यात आली असून यामध्ये जी२० देशांचे प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय संस्था आणि इतर भागधारक एकत्र येत आहेत.

शाश्वत आणि सर्वसमावेशक ऊर्जा सहकार्य साध्य करण्यासाठी सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणे व चर्चा करणे व सहयोग वाढवणे यासाठी या कार्यगटाची ही चौथी बैठक महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून काम करेल.

कृतिशील सहकार्याची संधी

ऊर्जाविषयक आव्हानांना तोंड देण्यासाठी कृतिशील सहकार्य करण्यासाठी उत्तम संधी या बैठकीतून विविध देशांना व प्रतिनिधींना मिळणार आहे.

पृथ्वीवरील मानवी समूहाच्या हितासाठी शाश्वत आणि सर्वसमावेशक ऊर्जा पर्याय सुनिश्चित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय भागीदारीसमवेत काम करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे रॉड्रिग्स म्हणाले.

प्रतिनिधींना मिळेल संस्कृतीचा अनुभव

या बैठकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात येणाऱ्या प्रतिनिधींना गोव्यातील उत्साहवर्धक, रमणीय वातावरणाचा आनंद घेतानाच येथील श्रीमंत, समृद्ध व वैविध्यपूर्ण वारसा व इतिहास अनुभवण्याचीही संधी मिळेल, असे रॉड्रिग्स म्हणाले.

नैसर्गिक सौंदर्य आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीसाठी ओळखला जाणारा गोवा या महत्त्वपूर्ण संमेलनासाठी एक आदर्श स्थान ठरतो. गोव्यात होणाऱ्या ऊर्जा संक्रमण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीसाठी जी२० देशांच्या महनीय प्रतिनिधींचे यजमानपद भूषवण्याची संधी गोव्याला मिळाल्याचा आम्हाला सन्मान वाटतो.

संजीत रॉड्रिग्स, जी२० नोडल अधिकारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT