Goa Fuel Supply Normal Dainik Gomantak
गोवा

इंधन-एलपीजी पुरवठा सुरळीत, सरकारचा दावा; रांगा न लावण्याचे नागरिकांना आवाहन

Goa Fuel Supply Normal: गोव्यातील पेट्रोल, डिझेल आणि लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) ची उपलब्धता सध्याची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेशी असल्याची पुष्टी राज्यातील तेल विपणन कंपन्यांनी केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्यातील पेट्रोल, डिझेल आणि लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) ची उपलब्धता सध्याची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेशी असल्याची पुष्टी राज्यातील तेल विपणन कंपन्यांनी केली आहे.

या संदर्भात आज सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांचे राज्यस्तरीय समन्वयक मधुरेंद्र के. पांडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कंपन्या पुरवठ्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि लॉजिस्टिक्स सुरळीत करण्यासाठी, वितरणाला गती देण्यासाठी पावले उचलण्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संपूर्ण राज्यात इंधन पुरवठा अखंडित सुरू आहे. पुरवठ्यातील स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनासोबत समन्वय सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी वितरणाला प्राधान्य दिले आहे. सिलिंडरचे वितरण नियोजित वेळापत्रकानुसार सुरू आहे. सध्या, उद्योग स्तरावर गोव्यात दररोज सुमारे १० हजार ६०० घरगुती एलपीजी सिलिंडर वितरित केले जातात. हे प्रमाण अलीकडील भू-राजकीय घडामोडींपूर्वी नोंदवलेल्या वितरण पातळीशी सुसंगत असून, सध्याची गरज पूर्ण करणारे आहे.

फ्री ट्रेड एलपीजी!

याशिवाय स्थलांतरित कामगार आणि स्थानिक पत्त्याचा पुरावा नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी, वैध सरकारी फोटो ओळखपत्र आणि एक घोषणापत्र सादर केल्यावर अधिकृत वितरकांकडे ५ किलोचे ''फ्री ट्रेड एलपीजी'' (एफटीएल) सिलिंडर उपलब्ध आहेत.

साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन बाजारपेठेत तपासणी आणि अंमलबजावणी मोहीम राबवत आहे. आतापर्यंत गोव्यातील जिल्हा प्रशासनाने ३०५ छापे टाकले असून, अनियमितता आढळलेल्या प्रकरणांमध्ये कारवाई केली आहे, असे पांडे यांनी नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 'दक्ष'ची गरुडझेप! परिस्थितीशी झुंज देत गाठलं यश, आता ध्येय 'सीए' होण्याचं, पण आर्थिक मदतीची प्रतीक्षा

Handshake Controversy: 'हॅन्डशेकसाठी आम्ही भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुमपर्यंत गेलो', सलमान अली आगाचा खुलासा; क्रिकेट विश्वाचं वेधलं लक्ष VIDEO

Goa Crime: पोलिस कोठडीत मारहाणीमुळे तरुणाची आत्महत्या, वाळपई तणाव; पोलीस उपनिरीक्षकावर कारवाईसाठी कुटुंबीय आक्रमक

नेपाळच्या 'दीपेंद्र'चा मोठा धमाका! सलग दोनदा 6 चेंडूत 6 षटकार ठोकल्यानंतर आता वनडेत रचला अनोखा इतिहास; गोलंदाजांची उडवली दाणादाण

Goa Drug Case: राहत्या घरी 'गांजा'ची शेती! थिवीच्या रहिवाशाला कोर्टानं सुनावली सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा; सव्वाचार वर्षे चालला खटला

SCROLL FOR NEXT