Goa Crime: टँकर चालकावर जुन्या मालकाकडून खुनी हल्ला! पणजीतील प्रकार; संशयित समीर खानला अटक

Goa Crime News: पाण्याचा टँकर चालवताना झालेल्या अपघातामुळे आर्थिक नुकसान झाले आणि काम सोडून दुसऱ्याकडे कामाला लागला, या रागातून एका टँकर मालकाने आपल्या पूर्वीच्या टँकर चालकावर प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना पणजी येथे घडली.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पाण्याचा टँकर चालवताना झालेल्या अपघातामुळे आर्थिक नुकसान झाले आणि काम सोडून दुसऱ्याकडे कामाला लागला, या रागातून एका टँकर मालकाने आपल्या पूर्वीच्या टँकर चालकावर प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना पणजी येथे घडली आहे. या हल्ल्यात चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्या दोन्ही हातांना फ्रॅक्चर झाले आहे. याप्रकरणी पणजी पोलिसांनी संशयित समीर खान (पणजी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.

मूळ नेपाळ येथील रहिवासी असलेला शंकर राम बहादूर बिका (वय २४, भाटले - पणजी) हा संशयित समीर खान याच्याकडे टँकरवर चालक म्हणून कामाला होता. काही दिवसांपूर्वी शंकर चालवत असलेल्या टँकरचा एका कारला अपघात झाला होता. या अपघातात टँकरचे सुमारे १ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले होते. या घटनेनंतर शंकरने समीरचे काम सोडले आणि तो दुसऱ्या मालकाकडे कामाला लागला होता.

Goa Crime
Goa Theft: चाकूचा धाक दाखवून बाणावलीत डॉक्टरला  लुटले, दीड लाखांचा ऐवज पळविला

जखमी शंकरने गुरुवारी पणजी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीररीत्या डांबून ठेवणे आणि गंभीर दुखापत करणे या कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पणजी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक नितीन नाईक या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Goa Crime
Goa Accident Death: 98 दिवसांत 66 जणांचे बळी, दर तिसऱ्या दिवशी एक मृत्यू; 80 टक्के अपघातांत दुचाकी

डांबून घालून मारहाण

८ एप्रिल रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास शंकर याला समीर खान याने अडवले पणजी बसस्थानकाजवळील आपल्या कार्यालयात नेले. तेथे त्याला डांबून ठेवत घातक शस्त्राने शंकरवर खुनी हल्ला केला. त्यात शंकरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले आहेत. याशिवाय शरीराच्या इतर भागांवरही गंभीर जखमा झाल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com