Goa Summer Fruits Market Dainik Gomantak
गोवा

Goa Summer Fruits: बाजारांमध्ये रानमेवा घेण्यासाठी झुंबड! काय आहेत जांभूळ, करवंद, फणसाचे दर? जाणून घ्या..

Goa Seasonal fruit Rates: मानकुराद आंबा अजूनही भाव खात आहे. पणजी बाजार अजूनही मानकुराद आंबा हजार रुपये प्रती डझन दराने विकला जात आहे.

Sameer Panditrao

पणजी: राज्याच्‍या ग्रामीण भागात करवंदे, जांभूळ, फणस, आंब्याचे पीक बहरात आले आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात रानमेवा दाखल होत असून करवंदे आणि जांभूळ हा रानमेवा अधिक भाव खात आहे. जांभूळ आरोग्यासाठी खास करून मधुमेही रुग्णांसाठी लाभदायी असल्याने अनेकजण आवर्जून जांभळे खरेदी करत आहेत.

करवंदे आणि जांभळांचा प्रतिवाटा ५० रुपये दराने विक्री होत असून पणजी बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. यासोबतच राज्यातील मानकुराद, मांगीलाल आदी आंब्यासोबतच हापूस, शेंदूर, पायरी, केसर आदी आंब्यांची आवकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

मानकुराद आंबा अजूनही भाव खात आहे. पणजी बाजार अजूनही मानकुराद आंबा हजार रुपये प्रती डझन दराने विकला जात आहे, तर हापूस आंबा ५०० ते ६०० रुपये प्रती डझन दराने विकला जात आहे. या आंब्यासोबतच जांभ, फणसाचे गरे आदींना देखील चांगली मागणी आहे. पिकलेले फणसाचे गरे ५० रुपये प्रती वाटा दराने विकले जात आहेत. यासोबतच, नीरफणस, भाजीची केळी, आदींना देखील चांगली मागणी आहे. बाजारात सध्या उपलब्ध झालेल्या फळांच्या खरेदीसाठी नागरिकांचीही गर्दी वाढत आहे.

नारळ दरवाढीचा भडका

गोव्याला काजू आणि नारळ उत्पादनासाठी ओळखले जायचे, परंतु सद्यःस्थितीत दोन्ही पिकांची अवस्था अतिशय बिकट असून नारळाच्या किमतीचा भडका उडाला आहे.

माकडांच्या उच्छादामुळे नारळाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याने मध्यम आकाराचा एक नारळ आता ५० रुपयांना विकला जात आहे. सध्या लग्नसराईत नारळाला अधिक मागणी असल्याने दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

बाजारातील दर असे...

जांभूळ, करवंदे

५० रुपये वाटा

फणसाचे गरे

५० रुपये वाटा

मानकुराद आंबा १००० रु. डझन

हापूस आंबा ६०० रु. डझन

नारळ

५० रुपये नग

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT