Enforcement Directorate Dainik Gomantak
गोवा

Goa Fraud Case: ईडीची मोठी कारवाई! मायरन रॉड्रिग्जची 3 कोटींची मालमत्ता जप्त; गोमंतकीयांना घातला कोट्यवधींचा गंडा

Myran Rodriguez Assets Seized: १३० कोटींच्या कथित शेअर मार्केट घोटाळ्यामधील संशयित मायरन रॉड्रिग्ज याची सुमारे ३ कोटींची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीअंतर्गत जप्त केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सुमारे १३० कोटींच्या कथित शेअर मार्केट घोटाळ्यामधील संशयित मायरन रॉड्रिग्ज याची सुमारे ३ कोटींची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीअंतर्गत जप्त केली आहे. त्याच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी ‘ईडी’ने अटकेसाठी ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. तो लंडन येथे असल्याने त्याला भारतात आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत, अशी माहिती ‘ईडी’ सूत्राने दिली.

‘ईडी’ने संशयित मायरन रॉड्रिग्ज याची मालमत्ता जप्त केली आहे, त्यामध्ये सासष्टी येथील सुमारे २१.९० लाखांचा १३९.३३ चौ.मी. क्षेत्रफळ असलेल्या एकमजली इमारत कॉम्प्लेक्समध्ये असलेला रेनबो व्हिला, १ कोटी ४४ लाखांचा वडाळा-मुंबई येथे ४५६ चौ. फूट असलेला फ्लॅट, सासष्टी येथे असलेला ९५.२० लाखांचा सर्व्हे क्रमांक ४१/१-ए मध्ये असलेला भूखंड तसेच दीपाली परब हिच्या नावाने एचडीएफसी बँकेत ठेव असलेल्या तीन वेगवेगळ्या रकमा यांचा समावेश आहे.

जादा व्याजाचे आमिष दाखवून गंडा

संशयित मायरन रॉड्रिग्ज व त्याची पत्नी दीपाली परब यांनी सासष्टीतील अनेक लोकांना गुंतवणुकीवर जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींना गंडा घातला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे कक्षाने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. या प्रकरणाचा तपास सध्या गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. चौकशीसाठी संशयित मायरन याची घटस्फोटीत पत्नी सुनीता रॉड्रिग्ज हिला गुन्हे शाखेने बोलावले होते. मात्र, ती सहकार्य करत नसल्याने तिला अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्यातील रक्कमेचा स्रोत शोधून काढण्यासाठी तसेच त्याचा वापर मनी लाँडरिंगसाठी (Money Laundering) केल्याच्या संशयावरून ‘ईडी’नेही त्यांची चौकशी सुरू केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पाहताक्षणी विजयनगर साम्राज्याच्या प्रेमात पडला होता पोर्तुगीज व्यापारी; वाचा 400 वर्षापूर्वीचे प्रवास वर्णन

Rashi Bhavishya 26 September 2025: कुटुंबात सौख्य वाढेल, प्रेमसंबंधात गोडवा; परदेशातून शुभवार्ता येणार

Jasprit Bumrah: आधीही चुकीचा होतास आत्ताही! रोहित-सूर्याच्या कप्तानीखाली गोलंदाजीची तुलना करणाऱ्या कैफला बुमराहने दिलं सडेतोड उत्तर

धक्कादायक! शेवपुरी खाणं बेतलं जीवावर, दोडामार्गच्या 35 वर्षीय तरुणाचा गोव्यात मृत्यू

Child Health Tips: पालकांनो, दुर्लक्ष नका करु! मुलांच्या आरोग्यासाठी वर्षातून एकदा हिमोग्लोबिन तपासणी का करावी? योग्य पातळी किती असावी? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT